शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आता ISRO ब्लॅक होलचे रहस्य उलगडणार; याच महिन्यात लॉन्च होणार एक्स-रे पोलरीमेट्री मिशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 21:48 IST

अशा प्रकारचे हे देशातील पहिले आणि जगातील दुसरे मिशन असेल.

ISRO:चंद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ब्लॅक होल्सचे रहस्य शोधणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अशा प्रकारचे हे देशातील पहिले आणि जगातील दुसरे मिशन असेल, जे इतर खगोलीय घटनांसह ब्लॅक होल्सची माहिती गोळा करेल. यापूर्वी NASA ने अशी मोहीम राबवली आहे.

भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे नाव एक्स-रे पोलरीमेट्री आहे, ही एक प्रकारचा सॅटेलाईट आहे, जी विविध प्रकारच्या खगोलीय स्त्रोतांबद्दल माहिती देईल. यासोबत POLIX आणि XSPECT हे दोन पेलोड्सही असतील. या मिशनवर बरेच दिवस काम चालू होते. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी स्वतः जाहीर केले होते की, हे अभियान वर्षअखेरीस सुरू केले जाईल.

या दिवशी शुभारंभ होणार इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे हे पहिले ध्रुवीय मिशन या वर्षाच्या अखेरीस प्रक्षेपित करण्याचे प्रस्तावित होते. आता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्याची तारीख जाहीर केली आहे. एचटीच्या एका अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, हे मिशन 28 डिसेंबरपर्यंत प्रक्षेपित केले जाईल. शास्त्रज्ञांच्या मते या मोहिमेचा उद्देश तीव्र क्ष-किरण स्त्रोत आणि ध्रुवीकरणाचा तपास करणे आहे. हे खगोलशास्त्रातील रहस्ये सोडवण्याबरोबरच टाईम डोमेन अभ्यास आणि स्पेक्ट्रोस्कोपीवर लक्ष केंद्रित करेल, जे भारतासाठी खूप खास असणार आहे.

XPoSat मिशनमधून काय होईल?भारताचे एक्स-रे पोलरीमेट्री मिशन खूप खास होणार आहे. इस्रोच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे मिशन न्यूट्रॉन तारे, गॅलेक्टिक न्यूक्ली, पल्सर विंड नेब्युला आणि ब्लॅक होल यांसारख्या खगोलीय रहस्यांची उकल करेल. इस्रोच्या या मोहिमेमुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या अडचणी बऱ्याच अंशी कमी होणार आहेत. 

टॅग्स :isroइस्रोNASAनासाChandrayaan-3चंद्रयान-3