शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेंगळुरूमध्ये 'ISRO'तील वैज्ञानिकावर हल्ला, भर रस्त्यात थांबवली कार; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 11:10 IST

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील प्रोफाइलनुसार, आशीष लांबा हे इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. त्याच्यासोबत ही घटना बेंगळुरू येथील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील नव्या एचएएल अंडरपास जवळ घडली.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वैज्ञानीकावर कथित हल्ल्याच्या प्रकार समोर आले आहे. कर्नाटकातील बेंगळुरू येथून ही घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल गोच आहे. आशीष लांबा असे या वैज्ञानिकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसही अलर्ट मोडवर आले असून आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, 23 ऑगस्ट रोजीच इस्रोने पाठवलेल्या चांद्रयान 3 चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर, संपूर्ण देशाने इस्रोचे अभिनंदन केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील प्रोफाइलनुसार, आशीष लांबा हे इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. त्याच्यासोबत ही घटना बेंगळुरू येथील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील नव्या एचएएल अंडरपास जवळ घडली. त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमाने दिली आहे. महत्वाचे म्हणजे, घटनास्थळापासून इस्रोचे  कार्यालनय थोड्याच अंतरावर आहे.

आशीष लांबा म्हटले आहे, "काल, इस्रो कार्यालयाजवळ नव्याने बांधलेल्या HAL अंडरपासजवळ, एक हेल्मेट न घातलेली व्यक्ती बे जबाबदारपणे स्कूटी चालवत आमच्या समोर आली आणि आम्हाला अचानक ब्रेक लावावा लागला," आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, 'तो आमच्या कार जवळ आला आणि भांडू लागला. त्याने दोन वेळा माझ्या कारला पाय मारला.'

घटनेची माहिती मिळताच बेंगळुरू पोलीसही सतर्क झाले आहेत. यासंदर्भात बोलताना पोलिसांनी म्हटले आहे की, "घटनेची नोंद करण्यात आली असून आम्ही संबंधित अधिकार्‍यांना याची माहिती देऊ." तसेच, त्यांनी पुढील चौकशीसाठी लांबा यांचा संपर्क तपशील मागवला आहे. तसेच दुसरीकडे सोशल मीडिया युजर्सनीही हल्लेखोरावर कारवाईची मागणी केली आहे.

 

टॅग्स :isroइस्रोBengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी