शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय अंतराळवीर थेट चंद्रावर उतरणार; ISRO प्रमुख एस सोमनाथ यांची मोठी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 19:48 IST

भारतीय अंतराळवीराला चंद्रावर उतरवण्यासाठी ISRO ने चांद्रयान-4 मोहिमेला सुरुवात केली आहे.

ISRO: गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अवकाश संशोधन क्षेत्रीत मोठी प्रगती केली आहे. गेल्या वर्षीच भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (ISRO)ने चांद्रयान-3 ची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केली. चंद्राच्या या भागात यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला. या मोहिमेच्या यशानंतर आता ISRO चक्क एका मानवाला चंद्रावर उतरवण्याची तयारी करत आहे. ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना, एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यावर वेगाने काम सुरू आहे. 2040 मध्ये चंद्रावर एका मानवाला उतरवण्यासाठी चांद्रयान-4 ची योजना आखली जात आहे. चांद्रयान मालिकेला पुढे नेण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. पंतप्रधान मोदींनी घोषणा केली आहे की, 2040 मध्ये एक भारतीय व्यक्ती चंद्रावर उतरेल. यासाठी आपल्याला विविध मार्गांनी चंद्राचा शोध घेणे सुरुच ठेवावे लागेल.

ते पुढे म्हणतात, चांद्रयान-4 अंतराळयान चंद्रावर लँडिंग, नमुने गोळा करणे आणि भारतीय अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे. इस्रोकडे सध्या अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये रॉकेट प्रकल्प, उपग्रह प्रकल्प, अनुप्रयोग प्रकल्प आणि तंत्रज्ञान विकास प्रकल्पांचा समावेश आहे. आमच्याकडे सुमारे 5-10 रॉकेट प्रकल्प, सुमारे 30-40 उपग्रह प्रकल्प, 100 अनुप्रयोग प्रकल्प आणि हजारो संशोधन आणि विकास प्रकल्प आहेत.

सध्या गगनयानावर काम सुरूगेल्या वर्षी इस्रोने चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरवले होते. अमेरिका, रशिया आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरला. भारताचे सौर मिशन, आदित्य एल-1 देखील 2024 च्या सुरुवातीला यशस्वी झाले. आता या वर्षी भारताची सर्वात महत्वाकांक्षी मोहीम 'गगनयान' आहे. या मोहिमेत भारत आपले अंतराळवीर तीन दिवसांसाठी अंतराळात पाठवणार आहे. हे अभियान पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार जुलैमध्ये पार पडेल.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3Indiaभारत