शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इस्रो हेरगिरी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 05:02 IST

सूत्रांनी सांगितले की, १९९४मधील हेरगिरी प्रकरणात इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. नारायणन यांचा पोलिसांनी छळ केल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठित केली होती.

नवी दिल्ली : इस्रो हेरगिरी प्रकरणात शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आल्याच्या प्रकरणात चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.सूत्रांनी सांगितले की, १९९४मधील हेरगिरी प्रकरणात इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. नारायणन यांचा पोलिसांनी छळ केल्याची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती गठित केली होती. १४ सप्टेंबर २०१८ रोजी माजी न्यायाधीश डी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्याबरोबरच केरळ सरकारने अवमानित केल्याबद्दल नारायणन यांना ५० लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर असताना या शास्त्रज्ञाला अटक करण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल समितीने एका बंद पाकिटामध्ये सुपुर्द केला आहे. नारायणन यांना बेकायदेशीररीत्या अटक करण्यासाठी तत्कालीन शीर्ष पोलीस अधिकाऱ्यांना सीबीआयने जबाबदार धरले होते. चौकशी समितीने सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीत अटकेसाठी निर्माण झालेल्या स्थितीची चौकशी केली.काय आहे प्रकरण?इस्रोचे १९९४मधील हे हेरगिरीचे प्रकरण असून, भारतीय अंतराळ कार्यक्रमाबाबत निवडक गोपनीय दस्तावेज दोन शास्त्रज्ञ व मालदीवच्या दोन महिलांसह चार जणांनी दुसऱ्या देशांना हस्तांतरित केल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. सुरुवातीस या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला; परंतु नंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला. सीबीआयने ७९ वर्षीय माजी शास्त्रज्ञाला क्लीन चीट दिली. शास्त्रज्ञांचे म्हणणे होते की, केरळ पोलिसांनी हे प्रकरण त्यांच्या मनाला वाटेल तसे रचले व १९९४च्या प्रकरणात ज्या तंत्रज्ञानाची चोरी करण्याचा व ते विकल्याच्या आरोप लावले होते, ते तेव्हा अस्तित्वातच नव्हते. या प्रकरणात केरळचे माजी पोलीस महासंचालक सी. बी. मॅथ्यू, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक के. के. जोशुआ तसेच एस. विजयन व तत्कालीन उपसंचालक (गुप्तचर ब्यूरो) आर. बी. श्रीकुमार यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची गरज नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याला नारायणन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर शास्त्रज्ञाच्या बेकायदा अटकेसाठी सीबीआयने पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. समितीने सर्वोच्च न्यायालयात या अहवालातील निष्कर्ष अद्याप खुले झालेले नाहीत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयisroइस्रो