शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

कधी काळी पायांत घालण्यासाठी नव्हती चप्पल; आज आहेत इस्रोचे अध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 11:19 IST

तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका शेतकऱ्याचे असलेले पुत्र कैलाशवडीवू सिवन आज इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत आहेत.

थिरुअनंतपूरमः तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील सराक्कलविलाई गावातल्या एका शेतकऱ्याचे असलेले पुत्र कैलाशवडीवू सिवन आज इस्रोचं अध्यक्षपद सांभाळत आहेत. तसेच चांद्रयान-2 या मोहिमेचंही तेच नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे. सिवन यांनी एका सरकारी शाळेतून तमीळ माध्यमातून शिक्षण घेतलं आहे. नागरकोयलच्या एसटी हिंदू कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणाचे धडे गिरवले. सिवन यांनी 1980मध्ये मद्रास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (एमआयटी)मधून एयरोनॉटिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंसिज (आयआयएससी)तून इंजिनीअरिंगच्या पुढच्या शिक्षणाचे धडे गिरवले.2006मध्ये आयआयटी बॉम्बेतून इंजिनीअरिंगमध्ये पीएचडीची त्यांनी पदवी मिळवली. सिवन पीएचडी मिळवणारे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांची बहीण आणि भाऊ गरिबीच्या कारणास्तव उच्च शिक्षण पूर्ण करू शकलेले नाहीत. ते म्हणाले, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा शेतात वडिलांना मदत करायचो. त्यामुळेच वडिलांनी माझं नाव घराजवळच्याच कॉलेजमध्ये घातलं. तसेच मी बीएससीला गणितात 100 गुण मिळवले, त्यावेळी माझं मन बदललं. मी कॉलेजला धोती घालून जात होतो. एमआयटीला प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच मी पँट घातली. सिवन 1982मध्ये इस्रोमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रत्येक रॉकेट कार्यक्रमावर काम केलं.जानेवारी 2018मध्ये त्यांनी इस्रोचा पदभार सांभाळला, त्यापूर्वी ते विक्रम साराभाई स्पेस सेंटर(वीएसएससी)मध्ये संचालक होते. ते सेंटर रॉकेटची निर्मिती करायचं. त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्यानं सेवल यांना इस्रोचे रॉकेट मॅनही संबोधलं जातं. त्यांनी 15 फेब्रुवारी 2017ला भारताकडून 104 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हा इस्रोचा विश्व रेकॉर्डही आहे. सिवन यांना मोकळ्या वेळेत तमीळ गाणी ऐकणं आवडतं. आराधना हा त्यांच्या आवडीचा चित्रपट आहे. 

टॅग्स :isroइस्रो