शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

चंद्रावर पुन्हा तिरंगा फडकणार; ISRO ने सुरू केली Chandrayaan-5 मोहिमेची तयारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 21:58 IST

ISRO Chandrayaan-5 :केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला परवानगी दिली आहे.

ISRO Chandrayaan-5 : गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. चांद्रयान, सूर्ययान आणि गगनयानासारख्या मोहिमांद्वारे भारत आपली ताकद संपूर्ण जगाला दाखवत आहे. आतापर्यंत ISRO च्या सर्व चांद्रयान मोहिमांनी चंद्राविषयी नवनवीन शोध लावले आहेत. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व शोधणे असो किंवा जगात पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे असो. चांद्रयान मोहिमांमुळे नेहमीच भारतीय तिरंगा जगभरात उंचावला गेला आहे. अशातच आता भारताने चांद्रयान-5 मिशनची तयारी सुरू केली आहे.

केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला नुकतीच परवानगी दिल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर मानवांना उतरवण्याच्या भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

भारताची चांद्रयान-5 मोहीम काय आहे?इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणतात की, भारताने 2040 पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर मानव उतरवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारताची क्षमता वाढवण्यासाठी चांद्रयान-5 मिशन पाठवले जाईल. एवढेच नाही तर भारताने 2035 पर्यंत स्वतःचे स्पेस स्टेशन विकसित करण्याचेही लक्ष्य ठेवले आहे. चांद्रयान-5 मोहिमेला सरकारने मंजुरी दिली आहे. यात 350 किलो वजनाचा रोव्हर असेल. या मोहिमेवर भारत आणि जपान एकत्र काम करणार आहे.

चांद्रयान-5 पूर्वी भारताला चांद्रयान-4 मिशन पाठवायचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने गोळा करण्यासाठी ते पाठवले जाणार आहे. सरकारने चांद्रयान-4 मोहिमेला गेल्या वर्षीच मान्यता दिली होती. चंद्रावर सुरक्षित लँडिंग आणि त्यानंतर सुरक्षित परतण्यासाठी क्षमता वाढीसाठी हे अभियान पूर्ण करायचे आहे. याशिवाय, नमुने गोळा करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे हे उद्दिष्ट आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीच भारताने 3 चांद्रयान मोहिमा यशस्वी केल्या आहेत. भारताची चांद्रयान-3 मोहीम ही जगातील पहिली चंद्र मोहीम होती, ज्यामध्ये रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या मोहिमेद्वारे भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याची क्षमताही तयार केली आहे.

भारत 2035 पर्यंत अंतराळात मानव पाठवणार चांद्रयान आणि मंगळयान या मोहिमांसह भारत गगनयान मोहिमेवरही काम करत आहे. 2035 पर्यंत मानवाला अवकाशात पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याचेही लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्या फक्त 3 देश स्वतःचे स्पेस स्टेशन बनवू शकले आहेत, ज्यात अमेरिका, रशिया आणि चीनचा समावेश आहे. आता लवकरच यात भारताचे नाव जोडले जाईल.

टॅग्स :isroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3NASAनासाIndiaभारत