शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 09:52 IST

Israel-Iran War: मशहद शहरातून सुमारे एक हजार भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे हवाई क्षेत्र खुले केले आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत मायदेशी परतणाऱ्या भारतीयांची ही दुसरी तुकडी आहे.

Israel-Iran War: मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दोन्ही देशांनी हल्ले वाढवले आहेत. अनेक भारतीय नागरिक शिक्षणासाठी आणि कामासाठी इराणमध्ये आहेत. दरम्यान, आता या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज मशहद शहरातून सुमारे एक हजार भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी इराणने हवाई क्षेत्र खुले केले आहे. 

या भारतीय नागरिकांमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इराणी दूतावासाचे उपप्रमुख मोहम्मद जावेद हुसैनी म्हणाले की, 'गरज पडल्यास येत्या काळात भारतीयांना इराणमधून परत आणण्यासाठी अधिक उड्डाणे चालवता येतील. 

Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले

भारताने ऑपरेशन सिद्धू सुरू केले

इस्रायली हल्ल्यांनंतर भारतीय नागरिकांना तेहरानहून मशहदला हलवण्यात आले. इराणी एअरलाइन महान द्वारे चालवल्या जाणाऱ्या सुटकेच्या विमानांची व्यवस्था नवी दिल्ली करत आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे उद्भवलेल्या सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता, भारताने बुधवारी या दोन्ही देशांतील नागरिकांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले.

हुसैनी म्हणाले की, आम्ही भारतीयांना आपले मानतो. ते इराणी लोकांसारखे आहेत. इराणचे हवाई क्षेत्र बंद आहे, पण या समस्येमुळे, आम्ही भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी हवाई क्षेत्र सुरु करत आहोत.

भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरान यांच्यात संपर्क

भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी इराण भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्कात आहेत. इराण सोडू इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याची व्यवस्था करत आहोत, असंही त्यांनी म्हटले आहे.

गुरुवारी एकूण ११० भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले. त्यांना इराणमधून सीमेपलीकडून आर्मेनियाला नेण्यात आले. हुसैनी म्हणाले की, इराणमध्ये सुमारे १० हजार भारतीय राहत आहेत आणि ज्यांना घरी परतायचे आहे त्यांना बाहेर काढले जात आहे.

टॅग्स :IranइराणIndiaभारतIsraelइस्रायल