शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:56 IST

"इस्लामला बदनाम करण्यासाठी बार क्लब आणि जुगाराचे अड्डे सुरू करणे सोपे आहे. मात्र, इस्लामचे संरक्षण करणे कठीण आहे. जे केवळ इराण करत आहे. अमेरिका आणि इस्रायल मानवतेचे शत्रू आहेत..."

इस्रायलनेइराणवर केलेल्या हल्ल्याची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. इस्रायलनेइराणवर तुफान हल्ले केले आहे. यासंदर्भात आता शिया धर्मगुरु मौलाना यासूब अब्बास यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी इस्रायलच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच, इस्लामला बदनाम करण्यासाठी बार क्लब आणि जुगाराचे अड्डे सुरू करणे सोपे आहे. मात्र, इस्लामचे संरक्षण करणे कठीण आहे. जे केवळ इराण करत आहे. यावेळी, अमेरिका आणि इस्रायल मानवतेचे शत्रू आहेत, असेही ते म्हणाले.

मौलाना यासूब म्हणाले, "मी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करतो. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामागे पूर्णपणे अमेरिकेचा हात आहे. कारण इस्रायल आणि अमेरिका दोघेही नेहमीच इराण आणि मानवतेचे शत्रू राहिले आहेत. मी त्या इस्लामिक नेत्यांचाही निषेध करतो, जे मानवतेच्या या युद्धात इराणला पाठिंबा देण्याऐवजी अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देत आहेत."

मौलाना यासूब पुढे म्हणाले, "मी त्यांना सांगू इच्छितो की इस्लामला बदनाम करण्यासाठी बार, क्लब आणि जुगारचे अड्डे सुरू करणे फार सोपे आहे. मात्र, इस्लामचे रक्षण करणे अत्यंत कठीण आहे. जे आज इराण एकाकी करत आहे." 

इस्रायल-इराण तणाव वाढला - ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्राइलने इराणमध्ये हवाई हल्ले करत अणुकेंद्र, लष्करी तळ, अणुशास्त्रज्ञ आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्यानंतर, इराणनेही ऑपरेशन प्रॉमिस सुरू करून इस्राइलवर जोरदार प्रतिहल्ला केला असून, इस्राइलच्या जवळपास प्रत्येक भागाला शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे इस्राइलमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांना तातडीने तळघरांमध्ये आश्रय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, इस्राइलच्या संरक्षण यंत्रणांनी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यातील बहुतांश क्षेपणास्त्रं रोखण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र या हल्ल्यात काही इस्राइली नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, या हल्ल्यात 78 जणांचा मृत्यू झाला असून 329 जण जखमी झाल्या आहेत, असे इराणने म्हटले आहे. तर इस्रायलने 20 जण मारले गेल्याची पुष्टी केली आहे.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणIslamइस्लामwarयुद्ध