नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची इस्लामिक स्टेटची धमकी

By Admin | Updated: January 19, 2016 14:47 IST2016-01-19T14:47:48+5:302016-01-19T14:47:48+5:30

एका निनावी व इस्लामिक स्टेटने कथित जबाबदारी घेतलेल्या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे

Islamic State threatens to kill Narendra Modi | नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची इस्लामिक स्टेटची धमकी

नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची इस्लामिक स्टेटची धमकी

>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १९ - एका निनावी व इस्लामिक स्टेटने कथित जबाबदारी घेतलेल्या पत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गोवा पोलीसांनी हे पत्र गोव्यातील सगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये हे पत्र वितरीत केले आहे. हे प्रकरण गोवा पोलीसांनी दहशतवादविरोधी पथकाकडे दिल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात राज्य सचिवालयात पोस्टकार्डवर लिहिलेले हे धमकीचे पत्र मिळाले आहे. त्यानंतर पोलीसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे एका पोलीस अधिका-याने सांगितले. हे पत्र कुठून आले, कुणी पाठवले आदीचा शोध घेण्यात येत आहे. पोस्टकार्डच्या तळाशी ISIS असं लिहिलेलं आहे. देशामध्ये गोहत्येला बंदी असल्याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला आहे. पोलीसांनी असं पत्र मिळालं असल्याचं मान्य केलं आहे.

Web Title: Islamic State threatens to kill Narendra Modi