‘इसिस’चा पहिला भारतीय मानवीबॉम्ब?

By Admin | Updated: September 14, 2014 03:13 IST2014-09-14T03:13:14+5:302014-09-14T03:13:14+5:30

(इसिस) या बंडखोर संघटनेसाठी मानवीबॉम्ब बनून स्वत:ला उडविणारा तरुण हा मूळचा तामिळनाडूतील चेन्नईचा राहणारा होता, या अनधिकृत वृत्ताची भारतीय सुरक्षा संस्था तपासणी करीत आहेत.

ISIS's first Indian human bomb? | ‘इसिस’चा पहिला भारतीय मानवीबॉम्ब?

‘इसिस’चा पहिला भारतीय मानवीबॉम्ब?

गांभीर्याने शहानिशा : चेन्नईतील तरुण इराकमध्ये फिदायीन
नवी दिल्ली : सिरिया-इराकमध्ये इस्लामी राज्य निर्मितीसाठी अत्याचारी संघर्ष करणा:या ‘इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया अॅण्ड इराक’ (इसिस) या बंडखोर संघटनेसाठी मानवीबॉम्ब बनून स्वत:ला उडविणारा तरुण हा मूळचा तामिळनाडूतील चेन्नईचा राहणारा होता, या अनधिकृत वृत्ताची भारतीय सुरक्षा संस्था तपासणी करीत आहेत.
या भारतीय फिदायीनबद्दलचे वृत्त खरे असेल तर त्याचे भारतावर अतिशय गंभीर परिणाम होऊ शकतात, कारण जगात कुठेही झालेल्या आत्मघाती हल्ल्यात एक भारतीय सामील असल्याची ही पहिलीच वेळ असेल. भारतातील 2क्-3क् तरुण ‘इसिस’मध्ये सामील झाल्याचे वृत्त आहे आणि निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी सुरक्षा संस्था या तरुणांबद्दलच्या माहितीवरच निर्भर आहेत. या पाश्र्वभूमीवर पहिला मानवीबॉम्ब हा मूळचा चेन्नईचा रहिवासी असल्याचे वृत्त आल्याने आणि ‘अल कायदा’नेही ‘कायदात अल जिहाद’ नावाची नवी शाखा भारतीय उपखंडातच स्थापन केल्याने सुरक्षा संस्थांची चिंता वाढली आहे. 
हे तरुण इराकमधून भारतात परतल्यानंतर येथे इस्लामिक राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रयत्न करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय जिहादींचा कल फिदायीन हल्ल्यांकडे वाढत असल्याचे राष्ट्रीय तपासी संस्थेच्या (एनआयए) तपासातून नुकतेच समोर आले होते. इंडियन मुजाहिद्दीन जेव्हा नेटवर आपापसात चॅटिंग करतात तेव्हा त्यांचे हे संभाषण सुरक्षा संस्थांकडून पकडण्यात येते. अशाच एका पकडलेल्या संभाषणावरून ही बाब उघडकीस आली. नरेंद्र मोदी यांच्या पाटणा रॅलीदरम्यान झालेला बॉम्बहल्ला हा त्याचाच एक भाग होता, असा निष्कर्ष सुरक्षा संस्थांनी काढला आहे.
भारतातील तरुण ‘इसिस’मध्ये 
दाखल झाल्याचे वृत्त जर खरे असेल तर ती चिंतेची बाब आहे आणि हे तरुण भारतात परतल्यानंतर काय घडेल याची आम्हाला जास्त चिंता वाटते, असे एका सुरक्षा संस्थेच्या अधिका:याने सांगितले. महाराष्ट्रातील कल्याण येथील चार तरुण इस्लामिक राष्ट्राकडून लढण्यासाठी इराकमध्ये गेले होते. त्यांपैकी एकाचा तेथे मृत्यू झाल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले होते.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
तीन नायजेरियन हद्दपार
च्व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात मुक्काम करणा:या नायजेरियाच्या तीन नागरिकांना शनिवारी भारतातून हद्दपार करून त्यांच्या देशात पाठविण्यात आले. तामिळनाडू सरकारच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
च्ओलाडातो ओबासोतो उर्फ रिचर्ड, डिक्सन एम. डिक्सन आणि अबियोदून ओलुवागबेमिगा अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही 2क् वर्षे वयोगटातील आहेत. शनिवारी सकाळी त्यांना दुबईमार्गी लागोसला पाठविण्यात आले. 

 

Web Title: ISIS's first Indian human bomb?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.