शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना स्नायपर रायफलनं मारण्याचा ISचा कट होता; गुजरात ATSचं केली होती दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 16:11 IST

दोघांविरोधात गुजरात एटीएसनं दाखल केलं आरोपपत्र

अहमदाबाद : गुजरात एटीएसनं आयसिस या दहशतवादी संघटनेच्या एका संशयित ऑपरेटिव्हविरोधात अंकलेश्वर न्यायालयात एक आरोपपत्र दाखल केलंय. यामध्ये आयसिसचा संशयित ऑपरेटिव्ह उबैद मिर्झाच्या नावाचा समावेश आहे. उबैद मिर्झा स्नायपर रायफलनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्या करण्याच्या तयारीत होता. याबद्दलचा उल्लेख त्यानं एका मेसेजिंग अॅपवरही केला होता. उबैद मिर्झाचा मोबाईल आणि पेन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलाय. पेशानं वकील असलेल्या उबैद मिर्झाला गुजरात एटीएसनं 25 ऑक्टोबर 2017 रोजी अटक केली. त्याच्यासोबतच पेशानं लॅब तंत्रज्ञ असलेल्या कासिम स्तिमबेरवाला या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. हे दोघेही सूरतचे रहिवासी आहेत. कासिमनं त्याच्या अटकेच्या 21 दिवस आधी त्याच्या पदाचा राजीनामा दिला होता, अशी माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यानं दिली. कासिमला जमैकाला जाऊन जिहादी कारवाया करायच्या होत्या. कट्टरतावादी मौलवी शेख अब्दुल्लाह अल फैसलच्या मदतीनं त्याला या कारवाया पूर्णत्वास न्यायच्या होत्या. जमैकात जाण्यासाठी त्यानं तेथील एका कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. यानंतर त्याला परवानादेखील मिळाला होता. गुजरात एटीएसनं अंकलेश्वर न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात उबैद मिर्झानं केलेल्या मेसेजचा उल्लेख केलाय. 'पिस्तुल खरेदी करायचंय आणि त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेन, असा मेसेज मिर्झानं 10 सप्टेंबर 2016 केला होता. मात्र तो नेमका कोणाशी संपर्क साधण्याबद्दल बोलत होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही,' असं एटीएसनं आरोपपत्रात म्हटलंय. 'मिर्झाला 11 वाजून 28 मिनिटांनी फेरारी नावाच्या व्यक्तीकडून एक मेसेज आला. मोदींना स्नायपर रायफलनं मारु, असा उल्लेख त्यामध्ये होता,' असंही आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातTerrorismदहशतवादterroristदहशतवादी