शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

ISIS मॉड्यूल : RAW आणि IB सोबत जम्मू-काश्मीरमध्ये 10 ठिकाणी NIA ची छापेमारी, अनेकांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 10:36 IST

isis module case : तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीरच्या 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, अवंतीपोरा यांचा समावेश आहे. जीशान अमीन, तनवीर, उमर अहमद आणि आरिफ खान यांना चौकशीसाठी दक्षिण काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

आयएसआयएस (ISIS) मॉड्यूल आणि टेरर फंडिंगच्या प्रकरणात रॉ (RAW) व आयबी (IB) सोबत एनआयएने (NIA) जम्मू-काश्मीरमधील 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच, तपास यंत्रणांनी बर्‍याच लोकांची चौकशीही केली आहे. आयएसआयएसच्या दहशतवादी मासिकावरून (टेटर मॅगजीन) हा छापा टाकण्यात आला. आतापर्यंत या मासिकाच्या 17 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. (isis module case terror funding nia with ib raw carried out raids in anantnag, srinagar, awantipore, baramulla in jammu kashmir)

या मासिकात भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवमधील वृत्तांताचा समावेश केला जातो. हे मासिक अफगाणिस्तानातून प्रकाशित करण्यात आले, असे समजले जात होते. मात्र तपासात असे निष्पन्न झाले की, याचे प्रकाशन आयएसशी संबंधित जम्मू-काश्मीर / दिल्लीच्या टीम करत आहे. आता तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीरच्या 10 ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनंतनाग, श्रीनगर, बारामुल्ला, अवंतीपोरा यांचा समावेश आहे. जीशान अमीन, तनवीर, उमर अहमद आणि आरिफ खान यांना चौकशीसाठी दक्षिण काश्मीरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती आजतक या हिंदी वेबसाइटने दिली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने सकाळी दारुल उलूम, दलाल मोहल्ला, नवाबाजार येथे पोलिस, एसओजी, एसडीपीओच्या अनेक अधिकाऱ्यांसह छापा टाकला. शोधमोहीम दरम्यान, कार्यालयातील काही नोंदी, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच हाका बाजार येथील रहिवासी अदनान अहमद नदवी याला अटक केली आहे. दरम्यान, हा दारुल उलूम उत्तर प्रदेशमधील लखनऊमधील दारुल उलूमशी संबंधित आहे. छापेमारी झाल्यानंतर तपास यंत्रणेचे पथक परतले आहे. आयएसआयएसमधील भरती, धर्मांधता आणि प्रचार-प्रसार या प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात एनआयएची टीम 9 जुलै रोजी काश्मीरमध्ये पोहोचली होती. याशिवाय दिल्लीहून आयबीची टीमही त्याच दिवशी काश्मीरला पोहोचली होती.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन वर्षांपूर्वी व्हॉईस ऑफ इंडिया मासिकाबद्दलही खुलासा केला आहे. दिल्लीच्या तिहार तुरूंगात आयएसचा एक दहशतवादी आणि जम्मू-काश्मीरमध्ये राहणार्‍या दाम्पत्याला दिल्लीहून अटक करण्यात आली. तिहार जेलमध्ये बंद दहशतवादी जेलच्या आतून मासिकाचा कंटेंट पाठवत होता.

दरम्यान, हे प्रकरण एनआयएने हाती घेतले आणि याप्रकरणी पुण्यातून अटकही करण्यात आली होती. व्हॉईस ऑफ इंडिया मासिकाचे प्रकाशन करून आयएस खुरासान मॉड्यूल टेलीग्राम वाहिनीत प्रसिद्ध केले जात असून मोठ्या प्रमाणात रेडिक्लायझेशनचे काम केले जात असल्याचा दावा एजन्सीने केला होता. 2020 मधील दिल्ली दंगलींच्या छायाचित्रांसह व्हॉईस ऑफ इंडिया मासिकामध्ये बराच चिथावणीखोर कंटेंट देखील प्रकाशित करण्यात आला होता. एजन्सीचा दावा होता की, आयएस खुरासान मॉड्यूलचे लोक व्हॉईस ऑफ इंडिया मासिक प्रकाशित करीत आहेत, ज्यांचा मुख्य हँडलर अफगाणिस्तानात बसला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा