शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:28 IST

India News: ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवून इराणमध्ये नेण्यात आलेल्या आणि तिथून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आलं आहे. भारत सरकारने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इराणसोबत केलेल्या चर्चेनंतर या भारतीय तरुणांची सुटका करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवून इराणमध्ये नेण्यात आलेल्या आणि तिथून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आलं आहे. भारत सरकारने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि इराणसोबत केलेल्या चर्चेनंतर या भारतीय तरुणांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात या भारतीय नागरिकांचं दक्षिण तेहरानमधील एका कथित पाकिस्तानी टोळक्याने अपहरण केलं होतं. दरम्यान, या भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आल्याची घोषणा ईराणी दूतावासाने मंगळवारी रात्री केली.  दरम्यान, पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय या अपहृत भारतीयांना पाकिस्तानात काम करणारे गुप्तहेर म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नात होती, असे या प्रकरणाची हाताळणी करणाऱ्या व्यक्तींनी सांगितले. 

गेल्या आठवड्यात इराणमधून अपहरण झालेल्या तीन भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानी फोन नंबरवरून खंडणीसाठी फोन आले होते. त्यामुळे या घटनेमागील आयएसआयचा हात उघड झाला होता. १ मे रोजी तेहरान येथे पोहोचल्यानंतर हे तिघेही भारतीय तरूण इराणमधून बेपत्ता झाले होते. संगरूर जिल्ह्यातील हुशनप्रीत सिंह, एसबीएसनगरमधील जसपाल सिंह आणि होशियापूर जिल्ह्यातील अमृतपाल सिंह अशी या तीन अपहृत भारतीयांची नावं होती.

पंजाबमधील एका एजंटने या तिघांनाही दुबई-इराणमार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं. आता भारत सरकार या एजंटचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का याचा शोध घेत आहे. दरम्यान, या तरुणांना ज्याने इराणमध्ये पाठवलं होतं, तो होशियारपूरमधून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :KidnappingअपहरणIndiaभारतIranइराणPakistanपाकिस्तान