भारतावर हल्ला करण्याचा इसिसचा कट

By Admin | Updated: July 30, 2015 04:34 IST2015-07-30T04:34:27+5:302015-07-30T04:34:27+5:30

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया तथा इसिस ही संघटना भारतावर हल्ला करण्याचे नियोजन करीत असून, अमेरिकेच्या विरोधात आर्मागेडॉन टाईप संघर्ष सुरू करण्याचा इसिसचा विचार आहे.

Isis cut to attack India | भारतावर हल्ला करण्याचा इसिसचा कट

भारतावर हल्ला करण्याचा इसिसचा कट

वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सीरिया तथा इसिस ही संघटना भारतावर हल्ला करण्याचे नियोजन करीत असून, अमेरिकेच्या विरोधात आर्मागेडॉन टाईप संघर्ष सुरू करण्याचा इसिसचा विचार आहे. या संघटनेत केली जाणारी भरती पाहिल्यास ते पाकिस्तानी व अफगाण तालिबान गटाशी युती करून एकच दहशतवादी संघटना उभी करण्याच्या विचारात आहेत.
यूएसए टुडे या वृत्तपत्राने मंगळवारी एक वृत्त प्रसिद्ध केले असून, त्यासाठी अमेरिकेतील एका माध्यम संस्थेच्या अहवालाचा आधार घेण्यात आला.
सीआयएचा माजी अधिकारी व सध्या ब्रुकलिंग संस्थेत काम करणारे वरिष्ठ अधिकारी ब्रुस रिडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार इसिसने भारतावर हल्ला केल्यास भारताचे स्थैर्य धोक्यात येईल.

Web Title: Isis cut to attack India