श्रीनगरमध्ये पुन्हा फडकले इसिस व पाकिस्तानचे झेंडे
By Admin | Updated: February 20, 2016 03:26 IST2016-02-20T03:26:59+5:302016-02-20T03:26:59+5:30
संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफझल गुरूचे छायाचित्र आणि पाकिस्तान व इसिसचे झेंडे घेऊन मोर्चा काढण्याचा काही युवकांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला.

श्रीनगरमध्ये पुन्हा फडकले इसिस व पाकिस्तानचे झेंडे
श्रीनगर : संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफझल गुरूचे छायाचित्र आणि पाकिस्तान व इसिसचे झेंडे घेऊन मोर्चा काढण्याचा काही युवकांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. श्रीनगरच्या ऐतिहासिक जामिया मशिदीजवळ शुक्रवारी ही घटना घडली. जेएनयूमधील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या मोर्च्यात हे झेंडे फडकावले गेल्याने तणाव निर्माण झाला.
युवकांचा एक गट स्वातंत्र्याच्या घोषणा देऊ लागला आणि त्यांनी नौहत्ता चौकाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. काही युवक हातात पाकिस्तान आणि इसिसचे ध्वज घेऊन चालत होते, तर काहींच्या हातात अफझल गुरूचे छायाचित्र असलेले आणि जेएनयू धन्यवाद असा संदेश लिहिलेले पोस्टर्स होते. (वृत्तसंस्था)