शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलांभोवतीही ISI चा फास! कारवायांत सामील करण्याच्या कटाचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2023 14:37 IST

शस्त्र पुरवठ्यासाठी वापर

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये महिला व अल्पवयीन मुले, मुलींना अतिरेकी कारवायांत सामील करून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ व संदेशाचे वहन करण्याच्या अत्यंत धोकादायक कटाचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तचर संस्था व सुरक्षा दलांनी अलीकडेच अतिरेक्यांच्या स्लीपर सेलवर कठोर कारवाई केली. त्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि सीमेपलीकडील अतिरेकी संघटनांनी आपल्या कारवायांमध्ये महिला व बालकांना सॉफ्ट टार्गेट बनवल्याचे पुढे आले आहे.

दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या असलेले शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा नियंत्रण रेषेपलीकडून (एलओसी) प्रयत्न होत असल्याने भारतीय सुरक्षा दलांना आता अधिक सतर्क राहावे लागणार असल्याचे श्रीनगर येथील चिनार कोरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल अमरदीप सिंह औजाला यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

चकमकींच्या प्रमाणातही घट 

  • काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले व चकमकींचे प्रमाण यावर्षी घटले. हा सकारात्मक संकेत आहे. स्थानिक लोकांचा दृष्टीकोनही खूप बदलला आहे. हाच कायम राखणे ही आता आमची जबाबदारी आहे. 
  • बदलत्या सुरक्षा वातावरणात आता आम्हालाही कार्यप्रणालीमध्ये बदल करावा लागणार आहे. जी-२० बैठक सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा दलांनीही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

संदेशवहनासाठी पारंपरिक साधने

अतिरेक्यांनी कारवाया तडीस नेण्याच्या पद्धतीत बदल केला आहे. बोलण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी मोबाइलसारख्या साधनांपासून आता ते दूर राहत असून त्यासाठी पारंपरिक साधनांचा उपयोग करीत आहेत. महिला व बालके या जाळ्यात अडकू नयेत, यासाठी सरकार व प्रशासनाच्या सहकार्याने लष्कर जनजागरण मोहीम राबवत आहे.

३३ वर्षांतील अतिरेक्यांची संख्या सर्वांत कमी

भारताने राबवलेल्या इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशनने अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे. बहुतांश अतिरेकी काश्मीर खोऱ्याच्या बाहेर गेले आहेत किंवा उर्वरित हालचालच करू शकत नाहीत. दहशतवादाचे अदृश्य रूप खरे चिंतेचे कारण आहे आणि आम्ही त्यावरही काम करत आहोत; परंतु, अंदाजानुसार अतिरेक्यांच्या संख्येत मागील ३३ वर्षांतील सर्वांत कमी आली आहे.

सुरक्षेत कसलीही कसूर नाही!

पाकिस्तानचे नाव न घेता लेफ्टनंट जनरल औजाला यांनी सांगितले की, काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर घुसखोरीचे प्रमाण कमी झाले; परंतु, पाकिस्तानच्या पीर पंजालच्या दोन्ही बाजूंनी व त्याचबरोबर पंजाबमध्येही घुसखोरीचे प्रयत्न सुरूच आहेत. सुरक्षा अधिक कडक केली पाहिजे. आम्ही यात कसूर करणार नाही.

टॅग्स :Terrorismदहशतवाद