इशरतप्रकरण: सोनिया गांधींकडून चिदंबरम यांची पाठराखण
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:10+5:302016-03-03T01:57:10+5:30
नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण केली आहे.

इशरतप्रकरण: सोनिया गांधींकडून चिदंबरम यांची पाठराखण
न ी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची पाठराखण केली आहे. सरकारमध्ये असल्यापासूनच आम्हाला लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी येथे पक्षाच्या बैठकीत सांगितले. माजी अवर सचिव आर.व्ही.एस. मणी यांनी इशरतप्रकरणी केलेल्या खुलाशामुळे प्रचंड वाद निर्माण झाला आहे; परंतु यासंदर्भात चिदंबरम यांनी आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली असल्याचे सोनिया गांधी यांनी काँग्रेस खासदारांना सांगितले. इशरतप्रकरणी सरकारने आपले प्रतिज्ञापत्र बदलले होते, असा गौप्यस्फोट माजी गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी केला होता. त्यानंतर मणी यांनी दुसर्या प्रतिज्ञापत्राचा आराखडा आपण तयार केला नव्हता आणि आपल्याला या प्रकरणाशी संबंधित दस्तावेजांवर स्वाक्षरी करण्याचा आदेश देण्यात आला होता, असे स्पष्टीकरण दिले होते. चिदंबरम यांनी आपल्याला बाजूला सारून दुसरे प्रतिज्ञापत्र तयार केल्याचा आरोपही पिल्लई यांनी केला आहे.