शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

निवाऱ्याचा मूलभूत अधिकार आहे की नाही? उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 07:17 IST

Supreme Court News: प्रयागराजमध्ये निवासी घरे पाडल्याचा प्रकार अमानवी व बेकायदा असल्याचे बजावून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पीडितांना सहा आठवड्यांच्या आत प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश प्रयागराज विकास प्राधिकरणास दिले.

 नवी दिल्ली - प्रयागराजमध्ये निवासी घरे पाडल्याचा प्रकार अमानवी व बेकायदा असल्याचे बजावून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पीडितांना सहा आठवड्यांच्या आत प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश प्रयागराज विकास प्राधिकरणास दिले. ज्या पद्धतीने ही घरे पाडली गेली, ते सद्सद्विवेकबुद्धिसाठी धक्कादायक आहे, अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले.

न्या. अभय ओक व न्या. उज्जल भुयान यांच्या न्यायपीठाने सुनावले की, घटनेच्या कलम-२१ नुसार निवाऱ्याचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांची घरे या प्रकारे पाडली जाऊ शकत नाहीत. 

याचिकाकर्त्यांचा आक्षेप काय?वकील झुल्फिकार हैदर, प्रोफेसर अली अहमद यांच्यासह इतर काही लोकांनी दाखल केलेल्या याचिकेत या कारवाईवर आक्षेप घेतला होता. शासन व प्रशासनाला असे वाटले की, ही मालमत्ता व जमीन गँगस्टर अतीक अहमद याच्या मालकीची आहे म्हणून ती पाडण्यात आली, असा हा आक्षेप होता. अतीक अहमद २०२३ मध्ये चकमकीत मारला गेला. 

नेमके प्रकरण काय?शहरी विकास प्राधिकरण अंतर्गत प्रकल्पात ७ मार्च २०२१ रोजी प्रयागराजमधील चार बांधकामे पाडण्यात आली होती. याबाबत १ मार्च रोजी संबंधितांना रजिस्टर पोस्टाने नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. त्या नोटिसा ६ मार्च रोजी या लोकांना मिळाल्या आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घरे पाडण्यात आली होती. या कारवाईवर आक्षेप घेणाऱ्या याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. 

पुस्तके घेऊन पळणाऱ्या मुलीच्या ‘त्या’ व्हिडीओने सर्वांनाच धक्का  उत्तर प्रदेशात बुलडोझरने झोपडी उद्ध्वस्त केली जात असताना एक आठ वर्षांची मुलगी पुस्तके हातात घेऊन झोपडीतून पळून जात असतानाच्या अलीकडील व्हिडीओने सर्वांनाच धक्का बसला आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या हृदयद्रावक प्रसंगावर भाष्य केले. प्रयागराजमधील अवैध पाडकामाच्या प्रकरणाची सुनावणी करताना आंबेडकरनगरच्या जलालपूरमधील व्हायरल व्हिडीओचा संदर्भ न्या. अभय एस. ओक आणि उज्जल भुयान यांनी दिला. तो व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती भुयान यांनी केली.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेश