शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एनएसडीच्या कॅम्पसमध्ये बहरला इरफान खानचा अभिनय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 05:16 IST

मंडी हाऊस चौकातील गोल चक्कर असो, एनएसडीचे कॅम्पस असो वा संगीत नाटक अकादमीचा परिसर असो इरफान यांच्या असंख्य आठवणी या परिसरात सामावलेल्या आहेत.

नितीन नायगावकर नवी दिल्ली : नजरेने बोलणारे मोजके नट हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाले. इरफान खान या मोजक्या नटांमध्ये आघाडीवर होते. जयपूरच्या रंगभूमीवरून दिल्लीतील नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामध्ये (एनएसडी) पोहोचल्यावर इरफान यांच्या अभिनयाने वेगळी भरारी घेतली. मंडी हाऊस चौकातील गोल चक्कर असो, एनएसडीचे कॅम्पस असो वा संगीत नाटक अकादमीचा परिसर असो इरफान यांच्या असंख्य आठवणी या परिसरात सामावलेल्या आहेत.१९८४ मध्ये इरफान जयपूर येथून दिल्लीच्या एनएसडीत दाखल झाले. त्यांच्यासोबत सुप्रसिद्ध अभिनेत्री मीता वशिष्ठ, हिंदी मालिकांमधील आघाडीचे कलावंत अशोक लोखंडे, इरफान यांची पत्नी सुतापा सिकदर एकाच वर्गातहोते.मीता वशिष्ठ आणि सुतापा यांच्यासह इतर काही कलावंतांसोबत एनएसडीतील एका नाटकाचे छायाचित्र चार वर्षांपूर्वी टष्ट्वीटरवर पोस्ट केले होते.‘वो भी क्या दिन थे एनएसडी के’ या शब्दांत त्यांने भावना व्यक्त केल्या होत्या. स्टार झाल्यावरही इरफान दिल्लीत असले की एनएसडीला यायचे.एनएसडीचे विद्यमान प्रभारी संचालक सुरेश शर्मा त्यांचे वरिष्ठ होते. रिकाम्या वेळात इरफानला पुस्तकांमध्ये दडलेला आम्ही बघायचो, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, तर एनएसडीच्या पहिल्या दिवसापासून खास मित्र असलेले अशोक लोखंडे यांनी ‘वेगळा विचार करणारा नट’ म्हणून इरफान यांचे वर्णन केले आहे.नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाने अनेक दमदार कलावंत दिले. त्यात इरफान यांची वेगळी ओळख राहिली आहे. एका मुलाखतीत इरफान म्हणाले होते, ‘आम्हाला एनएसडीमध्ये धीट राहायला शिकवले जायचे.अभिनयाचा धीटपणाशी काय संबंध आहे मला कळायचे नाही; पण आता मला लक्षात आले आहे. एक अभिनेता म्हणून ज्या क्षणी आपल्या हाती नकाशाचा तुकडा लागेल त्या क्षणी चालायला लागायचे. केवळ अंत:प्रेरणेच्या जोरावर स्वत:ला मुक्त ठेवा आणि काय घडते पाहायचे’.>इरफान खान सदैव स्मरणात राहतील -पंतप्रधान मोदीनवी दिल्ली : इरफान खान यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्य क्षेत्राची हानी झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटले. मोदी टिष्ट्वटरवर म्हणाले की, ‘‘इरफान खान हे वेगवेगळ््या माध्यमांतील त्यांच्या अष्टपैलू अभिनयाबद्दल सदैव लक्षात राहतील. त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांसोबत माझ्या सहवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’’>संघर्षाचे दिवस सोबत घालवलेतो वेगळा विचार करायचा. आम्ही ‘चाणक्य’, ‘राजपथ’, ‘नया दौर’, ‘बनेगी अपनी बात’, ‘जस्ट मोहोब्बत’ या मालिकांमध्ये सोबत काम केले. आम्ही बरे-वाईट, गरिबीचे, संघर्षाचे दिवस सोबत घालवले. मीता वशिष्ठ, इरफान, सुतापा, मी, इद्रीस मलिक आमच्यात खास मैत्र होते.- अशोक लोखंडे,सुप्रसिद्ध अभिनेते>खूप वाचन करायचाइरफान आम्हाला ज्युनिअर होता; पण अभिनयात बाप होता. एनएसडीत प्रत्येकवेळी त्याच्या हातात पुस्तक असायचे आणि रिकाम्या वेळात वाचनात गुंग असायचा. एनएसडीने जे दमदार नट दिले त्यात इरफानचा आवर्जून समावेश होतो. ‘संडे’ या चित्रपटातील दोन प्रसंगांमध्ये आम्ही सोबत काम केले. - सुरेश शर्मा, प्रभारीसंचालक नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा

टॅग्स :Irfan Khanइरफान खान