सोशल मीडिया आणि स्क्रीनला चिकटण्याने वाढतेय चिडचिड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 01:41 AM2018-08-03T01:41:52+5:302018-08-03T01:41:58+5:30
सोशल मीडियावर सतत चिकटून राहण्यामुळे चिडचिडेपणा, डोळ््यांचे विकार, उच्च रक्तदाब वाढत आहे. हा प्रश्न किती गंभीर आहे याचा अंदाज घेण्यासाठी एम्समध्ये बिहेव्हरीयल क्लिनिक सुरू झाले आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : सोशल मीडियावर सतत चिकटून राहण्यामुळे चिडचिडेपणा, डोळ््यांचे विकार, उच्च रक्तदाब वाढत आहे. हा प्रश्न किती गंभीर आहे याचा अंदाज घेण्यासाठी एम्समध्ये बिहेव्हरीयल क्लिनिक सुरू झाले आहे. स्क्रीनवर सतत राहणे, त्याशिवाय जगणे शक्य नाही अशा समस्या शोधून त्यावरील उपचारांशी संंबंधित आहे हे क्लिनिक. दरवर्षी इथे उपचार घेणाऱ्यांत २० टक्के वाढ होत आहे.
बिहेव्हरीयल क्लिनिक सुरू करणाºया तुकडीचे यतन पाल सिंह बलहारा म्हणाले की, फेसबुकचे हे पाऊल किती परिणामकारक ठरेल हे काळच सांगेल. २०१६ मध्ये सुरू झालेल्या क्लिनिकबद्दल बोलायचे तर तेथे उपचारांसाठी येणाºयांची संख्या वाढत आहे.
स्क्रीनला चिकटलेले लोक कॉलेजात जात नाहीत, आंघोळच करत नाहीत. मुले स्क्रीन बघत जेवतात. यावरील उपाय इंटरनेटबंदी नाही. स्क्रीनग्रस्त लोकांना आम्ही इंटरनेटचा चांगला उपयोग कसा करावा याची माहिती देतो. ते म्हणाले की, त्यामुळे मनगट दुखणे, डोळे कोरडे पडणे, पाठ व कंबर दुखणे या आता सामान्य तक्रारी झाल्या आहेत. गेम खेळताना मुले उत्तेजित झाल्याचे दिसले. परंतु, यामुळे रक्तदाब वाढल्याचा अभ्यास झालेला नाही.
डॉ. बलहारा म्हणाले की, आम्ही दिल्लीच्या पाहणीत इंटरनेट उपलब्ध असलेल्या आठवी ते १२ वीपर्यंतच्या मुलांपैकी १९ टक्के मुले स्क्रीनच्या आहारी गेल्याचे आढळले.
आम्ही २० देशांतही अभ्यास करीत असून त्यात अमेरिका, स्पेन, श्रीलंका, नेपाळ आहेत. इंटरनॅशनल स्टडी ग्रुप आॅन चाइल्ड अँड अॅडलसन्ट मेंटल डिसआॅर्डरकडून हा सर्व्हे सुरू आहे. यात सोशल मीडिया आणि स्क्रीनचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर किती प्रभाव पडत आहे, हे समजेल. बलहारा यांनी सांगितले की, भारतात १५ ते २५ वर्षांतील लोक स्क्रीन प्रश्नाने अधिक त्रस्त आहेत.
इंटरनेट वापरकर्त्यांपैकी २८२ दशलक्ष सक्रिय
भारतात ४६२.१ दशलक्ष इंटरनेट युजर्स आहेत. यातील २८२ दशलक्ष अत्याधिक सक्रि य आहेत. ते सात तास इंटरनेटचा वापरतात. एकूण ४३०.३ दशलक्ष लोक इंटरनेट मोबाइलवर वापरतात. हा एकूण इंटरनेट ट्रॅफिकचा ७९ टक्के आहे. एक युजर रोज जवळपास अडीच तास सोशल मीडियावर खर्च करतो तर एका युजरच्या मोबाइलमध्ये सरासरी सात अॅप असतातच.
स्क्रीनच्या मिठीतून सुटण्यासाठी कोर्स
स्क्रीन अॅडिक्शनतून सुटका होण्यासाठी आॅनलाईन अभ्यासक्रम आहे. पहिल्या तुकडीत ६० जणांनी नाव नोंदवले. ज्यांना स्क्रीनच्या व्यसनातून सुटका करून घ्यायची आहे ते हा अभ्यासक्रम करू शकतात. त्यासाठी या संकेतस्थळावर जावे लागेल. https://sites.google.com/view/enddtc-aiims/online-courses/basic-course-on-behavioral-addictions-involving-internet-use