‘आयआरएनएसएस-१सी’चे प्रक्षेपण लांबणीवर
By Admin | Updated: October 6, 2014 23:03 IST2014-10-06T23:03:41+5:302014-10-06T23:03:41+5:30
यआरएनएसएस-१सी’ आणि ‘आयआरएनएसएस-१बी’प्रमाणेच हे मिशनदेखील पीएसएलव्हीच्या एक्सएल आवृत्तीवर प्रक्षेपित केले जाईल.

‘आयआरएनएसएस-१सी’चे प्रक्षेपण लांबणीवर
बेंगळुरू : भारताची जलवाहतूक प्रणाली अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या समकक्ष बनविण्यासाठी सात उपग्रहांच्या मालिकेतील तिसरा उपग्रह असलेल्या‘आयआरएनएसएस-१सी’चे प्रक्षेपण आठवडाभर लांबणीवर पडले आहे़ नियोजित कार्यक्रमानुसार येत्या १० आॅक्टोबर रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार होते़ मात्र आता हे प्रक्षेपण आठवडाभर लांबणीवर पडले आहे़
भारतीय अंतराळ संशोधन संस्थे(इस्रो)ने आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे़ दूर अंतरावरून होणाऱ्या संदेशाचे स्वयंचलित प्रक्षेपण प्रणाली (टिलेमिट्री)चे अवलोकन करण्यासाठी ‘आयआरएनएसएस-१सी’चे प्रक्षेपण आठवडाभर लांबणीवर टाकण्यात आल्याचे इस्रोने म्हटले आहे़
पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ‘१० आॅक्टोबरला दुपारी १.५६ वाजता हा उपग्रह अंतराळाच्या दिशेने झेप घेणार होता़ त्यासाठी ६७ तासांची उलटगणती मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून सुरू होणार होती़ हा उपग्रह श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी२६ या यानाद्वारे अंतराळात सोडण्यात येईल. ‘आयआरएनएसएस-१सी’ आणि ‘आयआरएनएसएस-१बी’प्रमाणेच हे मिशनदेखील पीएसएलव्हीच्या एक्सएल आवृत्तीवर प्रक्षेपित केले जाईल.
आयआरएनएसएसच्या अॅप्लिकेशन्समध्ये क्षेत्रीय आणि सागरी निगराणी, आपत्ती व्यवस्थापन, वाहनांची निगराणी आणि जहाजांच्या ताफ्याचे व्यवस्थापन यांचा समावेश आहे, अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.
(वृत्तसंस्था)