आयआरसीटीसीची वेबसाईट सुरक्षितच

By Admin | Updated: May 6, 2016 02:25 IST2016-05-06T02:25:41+5:302016-05-06T02:25:41+5:30

रेल्वेची आॅनलाईन तिकीटे प्रवाशांकडून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन काढण्यात येतात. मात्र ही वेबसाईट हॅक झाल्याचे तसेच त्यातील प्रवाशांची माहीती गहाळ झाली

IRCTC web site safe | आयआरसीटीसीची वेबसाईट सुरक्षितच

आयआरसीटीसीची वेबसाईट सुरक्षितच

मुंबई : रेल्वेची आॅनलाईन तिकीटे प्रवाशांकडून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन काढण्यात येतात. मात्र ही वेबसाईट हॅक झाल्याचे तसेच त्यातील प्रवाशांची माहीती गहाळ झाली नसल्याचा दावा आयआरसीटीसीकडून करण्यात आला आहे. वेबसाईट सुरक्षितच असल्याचे आयआरसीटीसीकडून सांगण्यात आले. यातील तथ्य जाणून घेण्यासाठी आयआरसीटीसीने चार सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे. माहीती चोरीला गेल्याची माहिती गुरुवारी समोर आली. याबाबतचे स्पष्टीकरण आयआरसीटीसीकडून देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: IRCTC web site safe