शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

1 एप्रिलपासून रेल्वे तिकिटाच्या PNRमध्ये मोठा बदल, असा होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 08:58 IST

भारतीय रेल्वे 1 एप्रिलपासून प्रवाशांना नवी सुविधा देणार आहे.

नवी दिल्लीः भारतीय रेल्वे 1 एप्रिलपासून प्रवाशांना नवी सुविधा देणार आहे. विमान कंपन्यांसारखीच रेल्वेही आता एकामागाहून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर नेम रेकॉर्ड(PNR) जारी करणार आहे. या नियमानुसार पहिल्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे पुढची ट्रेनही सुटण्यास वेळ लागल्यास कोणतंही शुल्क न आकारता प्रवास रद्द करण्याचा प्रवाशाला अधिकार मिळणार आहे. हा नियम रेल्वेच्या सर्वच वर्गांसाठी लागू आहे. दुसऱ्या ट्रेनचं रिफंड मिळणारजेव्हा आपण ट्रेनचं तिकीट बुक करता, त्यावेळी एक पीएनआर नंबर मिळतो. हा PNR एक युनिक कोड असतो, ज्यामुळे आपल्याला ट्रेन आणि त्या संबंधीची सर्व माहिती मिळते. जर तुम्ही दोन ट्रेनच्या तिकीट बुक केल्या असल्यास दोन पीएनआर नंबर जनरेट होतात. भारतीय रेल्वेनं नियमांत बदल करून 2 पीएनआरला लिंक करण्यास सहजसोपं केलं आहे. मग आपण तिकीट ऑनलाइन किंवा काऊंटरवरून बुक करा. कोणत्याही पद्धतीत तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवाशाला सहज रिफंड मिळणार आहे. रिफंडचे नियम- दोन्ही तिकिटांवर प्रवाशाची माहिती एकासारखीच असावी. - हा नियम सर्व प्रवाशांना लागू आहे. - ज्या स्टेशनवर पहिली ट्रेन पोहोचली आहे आणि ज्या स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडायची आहे, त्यां दोन्ही ट्रेनचं स्टेशन एकच असायला हवं. रिफंडचे नवे नियम- जर कोणत्याही स्टेशनवर रिफंड न मिळाल्यास आपण भरलेला टीडीआर 3 दिवसांपर्यंत मान्य राहील. आपल्या रिफंडचे पूर्ण पैसे आपल्याला सीसीएम किंवा रिफंड ऑफिसमधून मिळतील. - जर आपण काऊंटरवरून रिझर्व्हेशनचं तिकीट घेतलं असेल, तर पहिली ट्रेन येण्यापूर्वीच्या 3 तासांमध्ये आपण दुसऱ्या ट्रेनचं तिकीट रद्द करू शकतो. रिफंडचे पैसे काऊंटरवरच मिळतील. - जर तिकीट ऑनलाइन बुक केली असेल, तर ज्या स्टेशनवर पहिली ट्रेन पोहोचली आहे आणि ज्या स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडायची आहे, त्याच स्टेशनवर टीडीआर भरावा लागणार आहे. - पहिली ट्रेन उशिरानं असल्यास कारण देत दुसऱ्या ट्रेनला सुटण्यास वेळ लागत असल्याचं कारण दिल्यासच आपल्याला रिफंड मिळणार आहे.  

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी