शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 09:18 IST

Iran-Israel Ceasefire: मध्य पूर्वेतील १२ दिवसांच्या तणावानंतर, इराण आणि इस्रायल यांनी युद्वविरामवर सहमती दर्शवली आहे. ही घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

Iran-Israel Ceasefire: मागील काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायमध्ये तणाव सुरू होता. १२ दिवसानंतर आता आज मिडल इस्टमध्ये युद्धविरामची घोषणा झाली आहे. दोन्ही देशांनी युद्धविरामसाठी सहमती दर्शविली आहे, ही घोषणा स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या भागात, कतारने आपले हवाई क्षेत्र उघडण्याची घोषणा केली आहे.

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावानंतर कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. आता, कतारच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने पुन्हा आपले हवाई क्षेत्र उघडण्याची घोषणा केली आहे.

रविवारी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने कतारमधील अमेरिकन हवाई तळावरही क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण, खबरदारी म्हणून, कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केले. ते आता पुन्हा एकदा उघडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

इंडिगोने ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली

मध्य पूर्वेकडून युद्धबंदीची बातमी येताच, इंडिगोनेही ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष संपल्यानंतर मध्य पूर्वेतील बहुतेक विमानतळ उघडले जातील. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच इंडिगोची विमाने या मार्गावरून उड्डाण करतील.

इंडिगोने सांगितले की, मध्य पूर्वेतील विमानतळ हळूहळू उघडत आहेत. आम्ही या मार्गावर पुन्हा उड्डाणे वेळापत्रकबद्ध करण्याचा विचार करत आहोत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री केल्यानंतरच या मार्गावरील उड्डाणे पुन्हा सुरू होतील. पुढील अपडेटसाठी आमच्या मोबाइल अॅप किंवा वेबसाइटवर संपर्कात रहा.

ट्रम्प यांनी युद्धविरामची घोषणा केली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये म्हटले की, "अभिनंदन, इराण आणि इस्रायल यांनी युद्धविरामवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांमध्ये ६ तासांच्या आत युद्धबंदीची प्रक्रिया सुरू होईल. प्रथम दोन्ही देशांमध्ये ६ तासांचा युद्धविराम असेल, त्यानंतर १२ तासांचा युद्धविराम असेल. जर या काळात दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला नाही, तर २४ तासांनंतर युद्ध औपचारिकपणे संपल्याचा विचार केला जाईल."

टॅग्स :IndigoइंडिगोIranइराणIsraelइस्रायल