शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

इराणकडून गोलन टेकड्यांवर रॉकेटसचा मारा; इस्त्रायलचे चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 19:19 IST

इस्रायलने गोलन टेकड्यांवर 1967 साली ताबा मिळवला होता. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आजवर मान्यता मिळालेली नाही.

तेल अविव- सीरियामधील इराणच्या बांधकांमाना लक्ष्य करत इस्रायली रॉकेटसनी इराणला चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली आहे. मध्यरात्री इराणने इस्रायलच्या ताब्यात असणाऱ्या गोलन टेकड्यांच्या क्षेत्रामध्ये 20 रॉकेट्स डागली होती असा आरोप इस्रायलने केला आहे. त्याला उत्तर म्हणून ही कारवाई केल्याचे लष्कराने स्पष्ट केले. इराण याबाबत तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गोलन हाईटसजवळ इस्रायली लष्करी दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

इस्रायलने गोलन टेकड्यांवर 1967 साली ताबा मिळवला होता. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला आजवर मान्यता मिळालेली नाही. गुरुवारी पहाटे इराणतर्फे सीरियात लढणाऱ्या दलाने 20 रॉकेटस डागली असे इस्रायलच्या लष्कराने सांगितले. याबाबत बोलताना लष्कराचे प्रवक्ते ले. कर्नल जोनाथन कॉन्रीकस म्हणाले,  यातील चार रॉकेटस आयर्न डोम या इस्रायली तंत्राद्वारे हवेतच पाडली गेली. उर्वरित रॉकेट्स त्यांच्या लक्ष्यावर आदळली. त्यानंतर इस्रायलने केलेल्या प्रतीहल्ल्यामध्ये इराणी इमारतींना लक्ष्य करण्यात आले. इराणी दलाच्या लॉजिस्टिक्स मुख्यालयाला प्रथम लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर दमास्कसच्या दक्षिणेस किस्वाह येथील लष्करी परिसर, इराणी दलाच्या दमास्कस विमानतळाजवळील गोदामाला लक्ष्य करण्यात आले.  

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्ध