आयपीएस अधिका-याला यूपीएससी परीक्षेत कॉपी करताना पकडले, योग्य कारण देता न आल्यास निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:10 IST2017-11-01T01:08:15+5:302017-11-01T01:10:46+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना आयपीएस प्रोबेशनरी आॅफिसरला पकडण्यात आले आहे. योग्य कारण देता न आल्यास त्यांना निलंबित केले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

आयपीएस अधिका-याला यूपीएससी परीक्षेत कॉपी करताना पकडले, योग्य कारण देता न आल्यास निलंबन
चेन्नई/ हैदराबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना आयपीएस प्रोबेशनरी आॅफिसरला पकडण्यात आले आहे. योग्य कारण देता न आल्यास त्यांना निलंबित केले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने रविवारी झालेल्या सिव्हिल सेवा (मुख्य) परिक्षेच्या दरम्यान २०१५ च्या बॅचचे अधिकारी साफीर करीम यांच्याबद्दलचा अहवाल तामिळनाडू सरकारकडून मागविला आहे.
गृह मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले की, असा व्यक्ती आयपीएस सेवेसाठी योग्य नाही. राज्य सरकारचा अहवाल मिळाल्यानंतर सेवेतून निलंबित करण्यासारखी कारवाई होऊ शकते.
अर्थात, करीम यांना त्यांची बाजू मांडण्याची एक संधी देण्यात येणार आहे. ते तामिळनाडू कॅडरचे आयपीएस प्रोबेशनरी आफिसर असून चेन्नई स्थित अगमोरे येथे एका परिक्षा केंद्रात यूपीएससीची मुख्य परीक्षा देताना कथितरित्या कॉपी करताना पकडण्यात आले. ते आयएएस होण्यासाठी परीक्षा देत होते.
पत्नी सांगत होती उत्तर?
चेन्नई पोलिसांनी सांगितले की, करीम यांची पत्नी कथितरित्या हैदराबादेतून त्यांना उत्तरे सांगत होती. करीम हे सद्या तिरुनेलवेलीच्या
नांगुनेरी येथे सहायक पोलीस अधीक्षक आहेत.
एका फोन, शर्टच्या बटनात ब्लू टूथचा छोटा कॅमेरा आणि वायरलेस अरपीससह ते परीक्षा केंद्रात गेले होते.