‘डेट’वर येण्यासाठी ‘आयफोन ७’
By Admin | Updated: February 28, 2017 04:15 IST2017-02-28T04:15:00+5:302017-02-28T04:15:00+5:30
काळासोबत प्रेमाची भाषा बदलू लागली आहे. आता प्रेम व्यक्तीवर नाही, तर वस्तूंवर अधिक केले जात आहे.

‘डेट’वर येण्यासाठी ‘आयफोन ७’
नवी दिल्ली : काळासोबत प्रेमाची भाषा बदलू लागली आहे. आता प्रेम व्यक्तीवर नाही, तर वस्तूंवर अधिक केले जात आहे. याचे उदाहरण अलीकडेच पाहावयास मिळाले. एका तरुणाने डेटवर चलण्यासाठी पंचतारांकित हॉटेलात जेवण आणि ‘आयफोन ७’ देऊ केल्यानंतर जवळपास दोन हजार मुली त्याच्यासोबत डेटवर जाण्यास तयार झाल्या.
‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी तरुणींनी आपल्यासोबत डेटवर चलावे, असे गुरगाव येथील शकुल गुप्ता या तरुणाला वाटत होते, परंतु यासाठी तरुणींचा होकार मिळविणे सोपे नव्हते. त्यामुळे त्याने तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी नामी शक्कल लढविली. आपल्यासोबत डेटवर येणाऱ्या तरुणीला पंचतारांकित हॉटेलात जेवण आणि आयफोन ७ देण्यात येईल, असे त्याने फेसबुकद्वारे जाहीर केले. शकुलने टिंडरच्या मदतीने फेसबुकवर स्टेटस् लिहिले की, ‘तुम्ही माझी व्हॅलेंटाइन’ बनू इच्छिता का? माझ्यासोबत डेटवर आल्यास ओबेरॉयमध्ये डिनर, आयफोन ७ आणि आॅडी ए ४ मधून लाँग ड्राइव्हवर जाण्याची संधी मिळेल.
>पाच जणींची केली निवड
शकुलने स्टेटस् लिहिल्यानंतर अवघ्या चार दिवसांत दोन हजार तरुणी त्याच्यासोबत डेटवर जाण्यास तयार झाल्या. एवढ्या मुलींना डेटवर नेणे शक्य नव्हते. त्यामुळे शकुलने पाच जणींची निवड केली. शकुलने आपला शब्द पाळला. त्याने या तरुणींना डेटवर नेले. सोशल मीडियावर त्याने या डेट्चे फोटोही शेअर केले आहेत.