सरसंघचालकांना कुंभमेळ्याचे निमंत्रण
By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:51+5:302015-07-10T21:26:51+5:30
- जलसंपदा मंत्री भेटीला : प्लास्टिकमुक्त कुंभमेळा करणार

सरसंघचालकांना कुंभमेळ्याचे निमंत्रण
- लसंपदा मंत्री भेटीला : प्लास्टिकमुक्त कुंभमेळा करणारनागपूर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेतली. या भेटीत त्यांनी सरसंघचालकांना नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुभमेळ्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले. नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी सरसंघचालक भागवत यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. मात्र, व्यस्ततेमुळे ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहता येणार नाही, पण तीन महिन्यात कुंभमेळ्यात नक्कीच येणार, असे भागवत यांनी स्पष्ट केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली आहेत. रस्ते, घाट यासाठी १६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कुंभमेळ्यासाठी लोकसहभागातून सहा ते आठ लाख झाडे लावण्यात आली आहे. प्लास्टिकमुक्त कुंभमेळा करण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत कुठलाही वाद किंवा तक्रार नसल्याचा दावा त्यांनी केला. चौकट...मुखर्जी, उपाध्याय यांचे फोटो लावण्यात गैर नाही - नेहरू युवा केंद्रात जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रदास मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांचा फोटो लावण्याबाबत दिलेल्या आदेशात काहीच गैर नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी आमचे आदर्श आहेत. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात गांधी परिवाराचे फोटो लावले होते याची आठवण त्यांनी करून दिली. या निर्णयाबाबत संघाने कोणताच हस्तक्षेप केला नसल्याचेही महाजनांनी स्पष्ट केले. चौकट...सिंचन घोटाळ्याचा तपास योग्यदिशेने सिंचन घोटळ्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. ॲन्टी करप्शन विभागाला सर्वकागदपत्रे देण्यात येत आहेत. याप्रकरणी जे दोषी असतील त्यांना शिक्षा होईल. निर्दोष असतील ते सुटतील असेही महाजन यांनी स्पष्ट केले.