सरसंघचालकांना कुंभमेळ्याचे निमंत्रण

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:47+5:302015-07-10T21:26:47+5:30

Invitation of Kumbha Mela to Sarsanghchalak | सरसंघचालकांना कुंभमेळ्याचे निमंत्रण

सरसंघचालकांना कुंभमेळ्याचे निमंत्रण

>- जलसंपदा मंत्री भेटीला : प्लास्टिकमुक्त सिंहस्थाचा संकल्प

नागपूर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेऊन त्यांना नाशिकला होणार्‍या कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले.
व्यस्ततेमुळे ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहता येणार नाही, पण कुंभमेळ्यास नक्की येऊ, असे भागवत यांनी त्यांच्याकडे स्पष्ट केले. पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, कुंभमेळ्याची तयारी पूर्ण झाली आहेत. रस्ते, घाट यासाठी १६० कोटी रुपये खर्च केले आहेत. कुंभमेळ्यासाठी लोकसहभागातून सहा ते आठ लाख झाडे लावण्यात आली आहे. प्लास्टिकमुक्त कुंभमेळ्याचा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले.
नेहरू युवा केंद्रात जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रदास मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांचा फोटो लावण्याबाबत दिलेल्या आदेशात काहीच गैर नाही. मुखर्जी आमचे आदर्श आहेत. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात गांधी परिवाराचे फोटो लावले होते, असे ते म्हणाले. सरकारच्या निर्णयात संघाने कोणताच हस्तक्षेप केला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
सिंचन घोटळ्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सर्व कागदपत्रे देण्यात येत आहेत. जे दोषी असतील, त्यांना शिक्षा होईल. निर्दोष असतील ते सुटतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Invitation of Kumbha Mela to Sarsanghchalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.