शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बोफोर्सचा तपास यापुढेही सुरूच राहील, सीबीआयचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:30 IST

या प्रकरणात काही नवी माहिती व पुरावे समोर आल्याने अधिक तपास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज ‘सीबीआय’ने गेल्या वर्षीच मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात केला होता.

नवी दिल्ली : बोफोर्स तोफांच्या खरेदीत ६४ कोटी रुपयांची कथित लाच दिली गेल्याच्या प्रकरणात अधिक तपास करण्याची परवानगी मागणारा केलेला अर्ज मागे घेतला याचा अर्थ हा तपास आम्ही बंद केला असा नाही. तपास सुरूच राहील, असा खुलासा सीबीआयने गुरुवारी केला.या प्रकरणात काही नवी माहिती व पुरावे समोर आल्याने अधिक तपास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज ‘सीबीआय’ने गेल्या वर्षीच मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात केला होता. तो अर्ज गुरुवारी मागे घेण्यात आला. त्यामुळे हा तपास आता कायमचा बंद झाला असा निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी हा खुलासा केला गेला.‘सीबीआय’चे प्रवक्ते आनंद वाकणकर म्हणाले की, मायकेल हर्शमन या खासगी गुप्तहेराच्या प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत नवी माहिती आल्याने आम्ही न्यायालयाकडे अधिक तपासाची परवानगी मागितली होती.ते म्हणाले, ८ मे रोजी न्यायालयाने असे मत व्यक्त केले होते की, स्वत:हून अधिक तपास करण्याचा अधिकार ‘सीबीआय’ला आहे. त्यामुळे असा तपास करण्यासाठी अर्ज करण्याची मुळात गरजच काय? त्यानंतर आम्ही कायदेशीर सल्ला घेतला व मुख्य दंडाधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज मागे घेण्यासाठी नवा अर्ज केला. त्यात आम्ही म्हटले की, दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १७३(८) अन्वये आधी आरोपपत्र दाखल केलेल्या प्रकरणात तपास पुढे सुरु ठेवण्यासाठी न्यायालयाची संमती घेणे बंधनकारक नसल्याने आम्ही आधीचा अर्जमागे घेत आहोत. ते म्हणाले की, तपास पुढे सुरु ठेवत असल्याचे न्यायालयास नुसते कळविणे पुरेसे आहे. तसे न्यायालयास कळविण्यात आले आहे.

अर्ज मागे घेण्याचा अधिकार आहेमुख्य महानगर दंडाधिकारी नवीन कुमार कश्यप यांना ‘सीबीआय’च्या वकिलाने आज सकाळी सांगितले की, अधिक तपासासाठी केलेला अर्ज तूर्तास आम्हाला मागे घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे काय करायचे ते नंतर ठरवू. ‘सीबीआय’ला अर्ज मागे घेण्याची अनुमती देताना दंडाधिकारी कश्यप यांनी नमूद केले की, केलेला अर्ज मागे घेण्याचे कारण ‘सीबीआय’ने स्पष्ट केलेले नाही. तरीही अर्ज त्यांनीच केलेला असल्याने तो मागे घेण्याचाही त्यांना अधिकार आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग