शस्त्रक्रियेतील हेराफेरीचा तपास एलसीबीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोलिस अधीक्षक कार्यालयात निदर्शने

By Admin | Updated: July 1, 2014 21:43 IST2014-07-01T21:43:33+5:302014-07-01T21:43:33+5:30

अकोला : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून रक्कम लाटण्यासाठी एका इसमावर पाठीच्या मणक्यांची जीवघेणी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर मणक्यामधील सुमारे एक लाख रुपये किमतीचे स्क्रू काढून या शस्त्रक्रियेत हेराफेरी करणार्‍या सिटी हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टरांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात निदर्शने केली.

Investigation of the rampage of the surgery at LCB demonstrations at the office of Nationalist Youth Congress Superintendent | शस्त्रक्रियेतील हेराफेरीचा तपास एलसीबीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोलिस अधीक्षक कार्यालयात निदर्शने

शस्त्रक्रियेतील हेराफेरीचा तपास एलसीबीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पोलिस अधीक्षक कार्यालयात निदर्शने

ोला : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून रक्कम लाटण्यासाठी एका इसमावर पाठीच्या मणक्यांची जीवघेणी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर मणक्यामधील सुमारे एक लाख रुपये किमतीचे स्क्रू काढून या शस्त्रक्रियेत हेराफेरी करणार्‍या सिटी हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टरांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात निदर्शने केली.
गोरगाव खु. येथील रहिवासी पांडुरंग दगडू वाघ (५२) यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांच्यावर १५ मे रोजी रामदास पेठेतील सिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ. उमेश गडपाल व डॉ. अतुल महाशब्दे यांनी पांडुरंग वाघ यांच्या पाठीच्या मणक्यांची शस्त्रक्रिया करून त्यामध्ये स्क्रू टाकले होते; मात्र काही दिवसांनी वाघ यांना पाठीचा त्रास वाढल्याने उपचारासाठी पुन्हा एका इतर डॉक्टरांकडे दाखल करण्यात आले होते. संबंधित डॉक्टरने एमआरआय व एक्सरे काढले असता त्यांच्या पाठीत स्क्रू नसल्याचे दिसून आले. यामुळे शस्त्रक्रियेत सिटी हॉस्पिटल प्रशासन व डॉ. उमेश गडपाल आणि डॉ. अतुल महाशब्दे यांनी हेराफेरी केल्याचा संशय वाघ यांचा मुलगा बजरंग वाघ याला आला. सिटी हॉस्पिटलमध्येच कामावर असलेल्या बजरंगला या संपूर्ण प्रकाराची माहिती नव्हती; मात्र त्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रामदास पेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. तक्रार करताच त्याला कामावरून काढण्यात आले व तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी न केली नाही. मंगळवारी या प्रकाराचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पोलिस अधीक्षक कार्यालयात निदर्शने केली. दोन्ही डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देऊन तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन वाकोडे, प्रदेश सरचिटणीस सिमांत तायडे, अनिल राऊत, महानगराध्यक्ष नितीन झापर्डे, सचिन भरणे, विनोद राऊत, देवानंद राऊत, बुडन गाडेकर, आशीष सावळे, रवी गीते, राहुल मिनोरे, सुहास साबे, आशीष शिरसाट, अश्विन दाते, अनिल वैराळे, संजय जाधव, महेश सरप यांनी निदर्शने केली.
फोटो - 02 सीटीसीएल 39

Web Title: Investigation of the rampage of the surgery at LCB demonstrations at the office of Nationalist Youth Congress Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.