सीबीआय तपास करा, अन्यथा आत्महत्या करू

By Admin | Updated: March 18, 2015 23:46 IST2015-03-18T23:46:17+5:302015-03-18T23:46:17+5:30

आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाने जनआक्रोश वाढत असतानाच त्यांच्या कुटुंबियांनीही हा घातपात असल्याचा संशय बुधवारी व्यक्त केला.

Investigate the CBI, otherwise committing suicide | सीबीआय तपास करा, अन्यथा आत्महत्या करू

सीबीआय तपास करा, अन्यथा आत्महत्या करू

कुटुंबाचा घातपाताचा आरोप : आयएएस अधिकारी रहस्यमय मृत्यू प्रकरण
बंगळुरू: प्रामाणिक आयएएस अधिकारी डी.के. रवी यांच्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाने जनआक्रोश वाढत असतानाच त्यांच्या कुटुंबियांनीही हा घातपात असल्याचा संशय बुधवारी व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; अन्यथा आत्महत्या करू, अशी धमकीही दिली.
कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दुसऱ्या दिवशीही सीबीआय चौकशीची मागणी करीत गदारोळ केला. मृत रवी यांच्या कुटुंबियांनी आज अचानक राज्य सचिवालय विधानसौध येथे धरणे दिले. रवी आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते, असे त्यांचे म्हणणे होते; परंतु प्राथमिकदृष्ट्या हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. धरणे देणाऱ्यांमध्ये रवी यांचे वडील करियप्पा, आई गौरम्मा आणि भाऊ रमेश यांचा समावेश होता. ३५ वर्षीय तरुण आयएएस अधिकारी डी.के. रवी सोमवारी त्यांच्या शहरातील फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मात्र या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची गरज नसल्याचे सांगितले. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या सुपूर्द केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरकारने सीआयडीचे महानिरीक्षक प्रणव मोहंती यांची बदली करून त्यांच्या जागी सी.एच. प्रताप रेड्डी यांची नियुक्ती केली आहे. (वृत्तसंस्था)

आम्हाला न्याय हवा
‘आम्हाला कुणालाही भेटायची इच्छा नाही. आम्हाला न्याय हवा आहे आणि न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू.’
-गौरम्मा, डी.के. रवी यांची आई

बंगळुरू येथे विधानसौंधपुढे रवी यांची आई गौरम्मा आणि वडील करिअप्पा यांनी धरणे दिली.
रवी यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले आहे. मृत्यूपूर्वी त्यांची कुणासोबत झटपट झाल्याचीही चिन्हे नाहीत. त्यामुळे रवी यांनी आत्महत्या केल्याचेच स्पष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.

Web Title: Investigate the CBI, otherwise committing suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.