शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"चौकशी करून योग्य कारवाई करा...", अविश्वास प्रस्तावाच्या नोटिशीवर ओम बिर्ला यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:50 IST

काँग्रेस खासदार के. सुरेश, गौरव गोगोई आणि मोहम्मद जावेद यांनी महासचिवांकडे हा प्रस्ताव सोपवला होता. यावर ११८ खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांनी मंगळवारी कनिष्ठ सभागृहाच्या महासचिवांकडे एक नोटीस सोपवली. विरोधकांकडून बिरला यांच्यावर, पक्षपातीपणाने सभागृह चालवणे, काँग्रेस सदस्यांवर खोटे आरोप करणे आणि पदाचा गैरवापर करणे, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आता अध्यक्ष ओम बिरला यांनी लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंह यांना, या नोटिसीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

११८ खासदारांनी केली स्वाक्षरी - काँग्रेस खासदार के. सुरेश, गौरव गोगोई आणि मोहम्मद जावेद यांनी महासचिवांकडे हा प्रस्ताव सोपवला होता. यावर ११८ खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद 94(C) अंतर्गत हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारांनी या नोटिशीवर स्वाक्षरी केलेली नाही. गौरव गोगोई म्हणाले, अध्यक्षांची कार्यपद्धती उघडपणे पक्षपाती असून विरोधी नेत्यांना त्यांचे लोकशाही अधिकार वापरण्यापासून रोखले जात आहे.

विरोधी नेत्यांना बोलू दिले जात नाही, विरोधकांचा दावा - या नोटिशीत म्हटले आहे की, "२ फेब्रुवारी २०२६ रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, भाषण पूर्ण करू दिले गेले नाही. ही केवळ एकच घटना नाही, तर नेहमीच असे होते की, विरोधी नेत्यांना बोलू दिले जात नाही. तसेच विरोधकांनी दावा केला की, ३ फेब्रुवारी रोजी आमच्या आठ खासदारांना संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. त्यांना केवळ लोकशाही अधिकारांचा वापर केल्याबद्दल शिक्षा करण्यात आली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Inquiry Ordered on No-Confidence Motion Against Speaker Om Birla

Web Summary : Opposition moved a no-confidence motion against Speaker Om Birla, alleging bias. Birla directed an inquiry into the notice filed by 118 MPs, accusing him of unfair practices and misuse of power. Opposition claims leaders are being silenced.
टॅग्स :lok sabhaलोकसभाom birlaओम बिर्लाcongressकाँग्रेस