शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

10 रुपये गुंतवा आणि कमवा भरघोस नफा, पोस्टाची जबरदस्त योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 17:53 IST

अनेकदा बँका किंवा विमा संरक्षण कंपन्यांच्या माध्यमांतून ग्राहकांना चांगल्या योजना मिळत असतात.

नवी दिल्ली- अनेकदा बँका किंवा विमा संरक्षण कंपन्यांच्या माध्यमांतून ग्राहकांना चांगल्या योजना मिळत असतात. परंतु आता तुम्हाला पोस्टानं एक फायदेशीर योजना उपलब्ध करून दिली आहे. पोस्टानं ग्राहकांसाठी आणलेल्या या योजनेत ग्राहकांना भरघोस नफा कमावता येणार आहे. पोस्टानं छोट्या योजनेच्याद्वारे रेकरिंग डिपॉझिटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या योजनेमार्फत तुम्ही बचत खात्यावर व्याजाच्या माध्यमातून जास्तीचा नफा कमावू शकणार आहात.या योजनेत तुम्ही 10 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. ज्यांचा महिन्याचा पगार फार कमी आहे, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर आहे. ब-याच बँका सेव्हिंग अकाऊंटवर 3.5 ते 4 टक्के व्याज देतात. जे महागाईच्या तुलनेत फारच कमी आहे. तर दुसरा पर्याय हा बँकेच्या एफडीचा असतो. एफडीमध्ये तुम्हाला व्याज जास्त मिळतं. परंतु पैसे मोठ्या काळासाठी बँकेत ठेवावे लागतात. त्यामुळेच पोस्ट ऑफिसची छोटी योजना असलेली आरडी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. पोस्टाच्या 1 वर्षांपासून 5 वर्षांपर्यंत ठेवलेल्या आरडी योजनेवर 6.9 टक्के व्याज मिळतं. बचत खातं- तुम्ही बँकेत अथवा पोस्टात सेव्हिंग अकाऊंटमध्ये प्रत्येक महिन्याला 2 हजार रुपये ठेवल्यास 5 वर्षांत तुमचे 1.20 लाख रुपयांची गुंतवणूक होते. त्याच प्रमाणे वर्षाला 4 टक्क्यांचं व्याज मिळून तुम्हाला 1,35,191 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला 15,191 रुपयांचं निव्वळ व्याज मिळणार आहे. आरडी- तुम्ही आरडीमध्ये दर महिन्याला 2 हजार रुपये जमा करत असल्यास 5 वर्षांत तुमची जमा झालेली रक्कम 1.20 लाख रुपयांच्या घरात जाते. त्यातच तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या आरडीवर क्वाटर्ली कंपाऊंडिंगनुसार 6.9 टक्के व्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला 5 वर्षांत जवळपास 1,44,305 रुपये फायदा मिळतो. जेणेकरून तुम्हाला फक्त 24,305 रुपये अतिरिक्त मिळतात.  तुम्ही आरडी खातं हे ऑनलाइनही उघडू शकता. मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही तुम्हाला आरडी उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला धनादेशाद्वारेही पोस्ट ऑफिसमध्ये आरडी उघडता येते. कॅश देऊनही तुम्ही आरडीचं खातं उघडू शकता.  

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस