रेल्वेगाड्यामध्ये वाढले अवैध व्हेंडर
By Admin | Updated: February 7, 2015 02:04 IST2015-02-07T02:04:56+5:302015-02-07T02:04:56+5:30
रेल्वेगाड्यामध्ये वाढले अवैध व्हेंडर

रेल्वेगाड्यामध्ये वाढले अवैध व्हेंडर
र ल्वेगाड्यामध्ये वाढले अवैध व्हेंडरसात जणांना पकडले : आरपीएफने राबविले अभियाननागपूर : परवाना नसताना रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकणाऱ्या अवैध व्हेंडरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकल्यामुळे त्याचा प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशा प्रवाशांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी कारवाई करून विविध रेल्वेगाड्यातील ७ अवैध व्हेंडरची धरपकड केली.रेल्वे प्रवासात पेंट्रीकार नसलेल्या रेल्वेगाड्यातील प्रवाशांच्या खाण्यापिण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे गाडीतील अवैध व्हेंडरकडील खाद्यपदार्थ विकत घेऊन खाण्याची पाळी त्यांच्यावर येते. निकृष्ट दर्जाचे भोजन असल्यामुळे अशा अवैध व्हेंडरकडील खाद्यपदार्थांचा प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रितसर परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक अवैध व्हेंडर रेल्वेगाड्यात खाद्यपदार्थ विकताना दिसून येतात. शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या विविध रेल्वेगाड्यांची तपासणी केली. यात ७ अवैध व्हेंडर खाद्यपदार्थ विकताना आढळले. त्यांना आरपीएफ ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध रेल्वे ॲक्ट १४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रवाशांनी अवैध व्हेंडरकडुन खाद्यपदार्थ विकत घेऊन खाणे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे................