घुसखोर पाकिस्तानी महिलेचा खात्मा

By Admin | Updated: May 16, 2017 01:49 IST2017-05-16T01:49:48+5:302017-05-16T01:49:48+5:30

पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेस सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळी घालून ठार केले.

The intruder's Pakistani woman's death | घुसखोर पाकिस्तानी महिलेचा खात्मा

घुसखोर पाकिस्तानी महिलेचा खात्मा

गुरदासपूर : पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेस सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळी घालून ठार केले. ही घटना सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
इशारा देऊनही ही महिला न थांबल्याने गोळीबार करावा लागल्याचे सीमा सुरक्षा दलाने सांगितले. गुरुदासपूर सेक्टरच्या बरियाला भागात भारत - पाकिस्तान सीमेवरून ही महिला घुसखोरी करत होती. या महिलेला थांबण्यास सांगितले, पण ती सीमेवरून पुढे पुढे येत होती. त्यामुळे या महिलेवर गोळीबार करण्यात आला.
ही महिला अंदाजे ६० वर्षांची असावी, असा अंदाज आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या महिलेने चेहरा झाकलेला होता. ज्यावेळी ती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होती आणि तिच्यावर गोळीबार करण्यात आला तेव्हा हे माहीत नव्हते की, ही एक महिला आहे.
बीएसएफने पाकिस्तानात आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि परिसरात सर्च आॅपरेशन सुरू केले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The intruder's Pakistani woman's death