शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कलह; नाराज नेत्यांकडून उघडपणे पंतप्रधान मोदींचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 14:17 IST

काँग्रेसच्या नाराज नेत्यांसोबत पक्ष हायकमांडच्या बैठकीचा सिलसिला सुरु आहे. परंतु त्याचा काही ठोस परिणाम होताना दिसत नाही

नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये सातत्याने नाराज नेत्यांचे प्रमाण वाढत चाललं आहे. असंतुष्ट नेत्यांची नाराजी दूर करण्याचे नेतृत्वाकडून प्रयत्न सुरु आहेत. गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता काँग्रेस नेता राज बब्बर यांनी उघडपणे पंतप्रधान मोदींचं कौतुक केले आहे. काँग्रेसमधील बहुतांश नेते सध्या पक्षात नाराज आहेत. त्यामुळे अनेकजण बाहेर पडण्याच्या स्थितीत आहे. 

काँग्रेस नेता राज बब्बर यांनी भाजपा सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेचं कौतुक करत ट्विटमध्ये लिहिलंय की, पंतप्रधान जन धन योजनेचे ८ वर्ष पूर्ण झाले आहेत. लोकांपर्यंत पैसे आणि मदतीविना पोहचलेली ही क्रांती आहे. यात सर्वाधिक खातेधारक महिला आहेत. अशीच योजना आपका पैसा आपके हाथ नावावर मनमोहन सरकारनं सुरू केली होती सध्याचं सरकारनं खूप चांगले काम केले आहे असं त्यांनी सांगितले. 

काँग्रेसच्या नाराज नेत्यांसोबत पक्ष हायकमांडच्या बैठकीचा सिलसिला सुरु आहे. परंतु त्याचा काही ठोस परिणाम होताना दिसत नाही. आता नेते विना दहशत मोदी सरकारचं उघडपणे कौतुक करत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून वाद शमण्याची चिन्हे नाहीत. आता पक्षाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडल्यानंतर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. विविध माध्यमातून काँग्रेस नेते त्यांची नाराजी बोलून दाखवत आहेत. 

आझादांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला धक्का आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, आता जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथे आझाद यांच्या समर्थनार्थ  काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मालिका सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, माजी मंत्री माजिद वानी, मनोहरलाल शर्मा यांच्यासह काँग्रेसचे ५१ मोठे नेते लवकरच राजीनाम्याची घोषणा करणार आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेस