झुरळाची भीती दाखवून पत्नीसोबत जबरदस्तीने संभोग

By Admin | Updated: January 18, 2017 11:19 IST2017-01-18T11:11:26+5:302017-01-18T11:19:19+5:30

झुरळाची भीती दाखवून पती जबरदस्तीने संभोग करतो, अशी तक्रार बंगळुरुतील एका महिलेने पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

Intimidation of intimacy with wife | झुरळाची भीती दाखवून पत्नीसोबत जबरदस्तीने संभोग

झुरळाची भीती दाखवून पत्नीसोबत जबरदस्तीने संभोग

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 18 - झुरळाची भीती दाखवून पती माझ्यासोबत जबरदस्तीने संभोग करतो, अशी तक्रार एका महिलेने पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. बंगळुरूतील इंदिरानगर परिसरात राहणा-या सुजाता नावाच्या महिलेने पती अविनाश शर्माविरोधात ही तक्रार केली आहे. पतीचे अनेक जणींसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने त्याच्यापासून दूर राहायचे आहे, असे सुजाताचे म्हणणे आहे.  मात्र अनेकदा संभोग करण्यासाठी अविनाश झुरळाची भीती दाखवतो, अशी तक्रार सुजाताने केली आहे.
 
अविनाश घाबरवण्यासाठी कधी कपड्यात तर कधी पलंगामध्ये झुरळ टाकतो, घाबरुन किंचाळल्याने त्याला विकृत आनंद होतो, असा आरोपही सुजाताने केला आहे. जबरदस्तीचा संभोग आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळलेल्या सुजाताने पतीकडे घटस्फोटाची मागणीही केली, मात्र यासाठी तिला नकार मिळाला, असे पोलिसांनी सांगितले.  
 
अविनाश शर्मा एका खासगी कंपनीत कामाला आहे. सुजाता आणि अविनाश कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. सुजातासोबत लग्न करण्याआधी अविनाशचे आणखी एक लग्न झाले होते.  मात्र ते जास्त काळ टिकू न शकल्याने त्याने सुजातासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. अविनाश आणि सुजाताच्या लग्नाला 10 वर्षे झाली असून त्यांना दोन मुलेही आहेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजाताने दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, अविनाश नेहमी जाणूनबुजून त्रास देतो. पदरात दोन मुले असल्यामुळेच आतापर्यंत त्याच्यासोबत राहिले आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्यानंतर मी त्याच्यापासून दूर राहू लागले आणि त्याला सांगितले की मला स्पर्शही करायचा नाही. मात्र यानंतर त्यानं झुरळाची भीती दाखवून जबरदस्तीने संभोग करायला सुरुवात केली.
 
पोलिसांनी हे प्रकरण 'वुमन काउंसलिंग सेंटर'कडे सोपवलं. यानंतर अविनाशला समन्स बजावण्यात आला. चौकशीदरम्यान अविशाननंही संभोगासाठी सुजाताला त्रास दिल्याची कबुली दिली आहे. सुजाताला झुरळाची भीती वाटते, हे अविनाशला माहिती होते याचाच फायदा त्याने घेतला.  अविनाशच्या छळानं टोक गाठल्याने अखेर पोलिसात धाव घेल्याचे सुजाताने सांगितले. 

Web Title: Intimidation of intimacy with wife