पिंपळगाव येथे इच्छुकांच्या मुलाखती
By Admin | Updated: January 23, 2017 20:13 IST2017-01-23T20:13:36+5:302017-01-23T20:13:36+5:30
पिंपळगाव बसवंत : शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील सुमारे ६० टक्के जनता शेतीवर जगते; परंतु केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतीचा कणाच मोडला आहे. चुकीच्या धोरणांमुळे आजचा तरु ण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकर्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले. येथील स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्र माप्रसंगी ते बोलत होते.

पिंपळगाव येथे इच्छुकांच्या मुलाखती
प ंपळगाव बसवंत : शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले जाते. देशातील सुमारे ६० टक्के जनता शेतीवर जगते; परंतु केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेतीचा कणाच मोडला आहे. चुकीच्या धोरणांमुळे आजचा तरु ण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. शेतकर्यांच्या आत्महत्त्या वाढत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले. येथील स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती कार्यक्र माप्रसंगी ते बोलत होते. शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती हे उत्तम माध्यम आहे. पक्षात निष्ठेने काम करणार्या कार्यकर्त्यांना संधी असते, असे शेटे यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार दिलीप बनकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, सचिन पिंगळे आदिंची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)