शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

देशात आता सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची गरज नाही, केंद्र सरकारचा निर्णय

By ravalnath.patil | Published: October 11, 2020 11:38 AM

Interview for Central govt jobs abolished in 23 states, 8 UTs : २०१५ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला मुलाखत देण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते.

ठळक मुद्देराज्य सरकारच्या पाठपुराव्यानंतर आता २३ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी मुलाखती घेणे बंद केले आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशातील २३ राज्यांसह आठ केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारमधील गट ब (विना-राजपत्रित) आणि गट सी दर्जाच्या पदांसाठी भरतीप्रक्रियामध्ये १०१६ पासून मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत, असे कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात जितेंद्र सिंह यांनी असे नमूद केले आहे. 

२०१५ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला मुलाखत देण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्मिक व प्रशिक्षण विभागाने यासंदर्भात दखल घेतली आणि केंद्र सरकारच्या भरतीमध्ये मुलाखती हटविण्याची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण केली. या योजनेची अंमलबजावणी  १ जानेवारी, १०१६ पासून झाली आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. 

याचबरोबर, सरकारी नोकरीसाठी मुलाखती न घेण्यासंदर्भातील हा नियम गुजरात आणि महाराष्ट्राने अतिशय वेगाने स्वीकारला, तर इतर राज्यांनी लवकरच याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. मात्र,  केंद्र सरकारच्या पाठपुराव्यानंतर आता २३ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलाखती घेणे बंद केले आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

मुलाखतीच्या गुणांमध्ये हेराफेरी निवेदनात म्हटले आहे की, भरती प्रक्रियेत पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया हटविण्याची ही प्रणाली स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत प्रभावी सिद्ध झाली आहे. अनेकदा नोकरीसाठी मुलाखतीच्या गुणांमध्ये हेराफेरी करण्यात येत होती आणि त्यासाठी मोठी रक्कम मोजली जात होती, असा आरोप बर्‍याच वेळा करण्यात येत होता.

टॅग्स :jobनोकरीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी