इंटरपोल प्रमुखपदाची भारताला हुलकावणी

By Admin | Updated: June 19, 2014 04:19 IST2014-06-19T04:19:08+5:302014-06-19T04:19:08+5:30

जर्मनीचे जुर्येगन स्टॉक यांना इंटरपोलचे विद्यमान सरचिटणीस रोनाल्ड के. नोबेल यांचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले असून याचसोबत भारत या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे़

Interpol chief flagging India | इंटरपोल प्रमुखपदाची भारताला हुलकावणी

इंटरपोल प्रमुखपदाची भारताला हुलकावणी

नवी दिल्ली : जर्मनीचे जुर्येगन स्टॉक यांना इंटरपोलचे विद्यमान सरचिटणीस रोनाल्ड के. नोबेल यांचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आले असून याचसोबत भारत या पदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे़
सीबीआयचे संचालक रंजीत सिन्हा हे सरचिटणीस पदासाठी निवडल्या गेलेल्या निवडक लोकांमध्ये पहिले भारतीय होते़ सिन्हा यांनी काल मंगळवारी फ्रान्सच्या लियोनस्थित इंटरपोलच्या मुख्यालयात स्टॉक यांच्यासह फ्रान्स, इटली, जॉर्डन आणि ब्रिटनच्या उमेदवारांसोबत मुलाखत दिली होती़ स्टॉक यांच्या उमेदवारीला कार्यकारी समितीने मंजुरी दिली़
यापश्चात स्टॉक यांच्या उमेदवारीस इंटरपोलच्या वरिष्ठ संचालक मंडळ असलेल्या महासभेची मंजुरी लागेल़ महासभेची बैठक येत्या नोव्हेंबरमध्ये मोनाको येथे नियोजित आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Interpol chief flagging India