शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
2
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
3
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
4
'ठाकरेंना अडचणीत आणणारं शपथपत्र द्या'; देशमुखांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'त्यांचा निरोप...'
5
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
6
'५ वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार'; खासदार अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
7
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
8
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
9
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा
10
Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!
11
Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!
12
प्राजक्ताने केलेल्या 'त्या' सहीचा उलगडा झालाच! अक्षय्य तृतीयेला नव्या चित्रपटाची शानदार घोषणा
13
Akshaya Tritiya च्या मुहूर्तावर Gold महागलं, चांदीही ८५००० रुपयांपार; जाणून घ्या आजचा भाव
14
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
15
हैदराबादच्या राणीची मेट गालामध्ये हवा; ८३ कोटींचा ड्रेस परिधान करुन रेड कार्पेटवर केली एन्ट्री
16
SBI Share Target Price : ₹१००० पर्यंत पोहोचणार SBI चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले, "खरेदी...."
17
गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!
18
भाजपने मोदींच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावावा; 'त्या' विधानावरून संजय राऊत संतापले
19
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
20
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी इंटरनेट, सोशल मीडिया वापराचे धोरण जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 4:41 AM

केंद्राचा इशारा; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाºयांनी समाजमाध्यमे व इंटरनेटचा कसा वापर करावा यासंदर्भात केंद्र सरकारने पहिलेवहिले धोरण तयार केले आहे. त्यानुसार कार्यालयीन कामासाठी सरकारने कर्मचाºयांना दिलेले मोबाईल, संगणक यांचा समाजमाध्यमांकरिता पूर्वपरवानगी असल्याशिवाय वापर करू नये असे केंद्रीय गृह मंत्रालयाने बजावले आहे. गोपनीय स्वरूपाच्या कागदपत्रांचे काम इंटरनेटची जोडणी असलेल्या संगणकावर न करता त्यासाठी स्टँडअलोन ही पद्धती वापरावी.

केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सल्लागार, भागीदार, माहिती सेवापद्धती हाताळणारे, संचालित करणारे लोक, सरकारच्या वतीने माहिती देणारे, तिच्याशी संबंध येणारे, ती साठविणारे व त्या माहितीवर प्रक्रिया करणारे अशा सर्व कर्मचाºयांनी सरकारी अधिकृत माहिती समाजमाध्यमांवर झळकवू नये. नव्या धोरणानुसार सरकारी गोपनीय माहिती गुगल ड्राइव्ह, ड्रॉपबॉक्स, आयक्लाऊड आदी खासगी वेबसाईटवर टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. ही माहिती उघड करणाºयावर कारवाई करण्यात येईल. कर्मचाºयांनी गोपनीय माहिती ही ई-मेलने पाठवू नये. तसेच शासकीय कामकाजासाठीचे अधिकृत ई-मेल वापरताना सार्वजनिक वाय-फाय सेवेचा वापर टाळावा.

२०२०पर्यंत देशात ७३ कोटी इंटरनेटधारकनीती आयोगाने केलेल्या पाहणीनुसार २०२० सालापर्यंत भारतात इंटरनेटधारकांची संख्या ७३ कोटी होईल. त्यातील ७५ टक्के जण ग्रामीण भागातील असणार आहेत व नव्यानेच इंटरनेटचा वापर करतील. देशामध्ये आगामी दोन वर्षांत १७.३ कोटी आॅनलाईन शॉपर असतील. प्रवास व ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणाºया उलाढालीत अनुक्रमे ५० टक्के व ७० टक्के वाढ होईल.