शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय टेरर मॉड्यूलचा विळखा; एका अमेरिकन आणि सहा युक्रेनियन नागरिकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:01 IST

भारताच्या विरोधात दहशतवादी कट रचल्याच्या आणि म्यानमारमधील बंडखोर गटांना ड्रोन पुरवल्याच्या आरोपावरून एनआयएने ७ परदेशी नागरिकांना अटक केली आहे.

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा एक मोठा आंतरराष्ट्रीय कट राष्ट्रीय तपास यंत्रणेने उधळून लावला आहे. भारताच्या विरोधात दहशतवादी कट रचल्याच्या आणि म्यानमारमधील बंडखोर गटांना ड्रोन पुरवल्याच्या आरोपावरून एनआयएने ७ परदेशी नागरिकांना अटक केली आहे. यामध्ये एका अमेरिकन आणि सहा युक्रेनियन नागरिकांचा समावेश असून, त्यांच्यावर 'यूएपीए' अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

विमानतळांवरून आवळल्या मुसक्या

मिळालेल्या माहितीनुसार, या कटाचा मुख्य दुवा असलेल्या अमेरिकन नागरिकाला कोलकाता विमानतळावर इमिग्रेशन विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर, लखनऊ आणि दिल्ली विमानतळावरून प्रत्येकी तीन युक्रेनियन नागरिकांना अटक करण्यात आली. या सर्वांना शनिवारी दिल्लीतील न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले होते. आता त्यांची कोठडी २७ मार्चपर्यंत वाढवण्यात आली असून, एनआयए त्यांची कसून चौकशी करत आहे.

काय आहे हा खतरनाक कट?

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हे आरोपी युरोपमधून मोठ्या प्रमाणात ड्रोनची तस्करी करून ते भारतामार्गे म्यानमारमधील सशस्त्र वांशिक गटांना पोहोचवत होते. हे गट भारतातील प्रतिबंधित उग्रवादी संघटनांना शस्त्रे, प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत पुरवण्याचे काम करत होते. आरोपींनी युरोपमधून आणलेले ड्रोन भारताच्या सुरक्षेसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकले असते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मिझोराम ठरले 'सेंटर पॉईंट'

हे सातही आरोपी आधी मिझोराममध्ये दाखल झाले होते आणि तिथून त्यांनी म्यानमारमध्ये प्रवेश केला. मिझोरामची ५०० किलोमीटरची सीमा म्यानमारला लागून असल्याने या भागाचा वापर तस्करी आणि प्रशिक्षणासाठी केला गेल्याचा संशय आहे. परदेशी नागरिकांना मिझोराममध्ये जाण्यासाठी विशेष परवानगी लागते, मात्र या आरोपींनी नियमांचे उल्लंघन केल्याचेही तपासात समोर आले आहे.

मोठा खुलासा होण्याची शक्यता

न्यायालयात एनआयएने स्पष्ट केले की, या आरोपींच्या मोबाइल डेटाची तपासणी, सोशल मीडिया अकाऊंटचे तांत्रिक विश्लेषण आणि त्यांच्या फंडिंगच्या स्त्रोतांचा शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे. या चौकशीतून भारतातील त्यांचे स्थानिक साथीदार कोण आहेत आणि हा 'ड्रोन वॉर'चा प्लॅन नेमका काय होता, याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. सध्या एनआयएने या प्रकरणी अधिकृत भाष्य करणे टाळले असले, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : International terror module busted at border; American, Ukrainians arrested.

Web Summary : NIA thwarted a terror plot, arresting seven foreigners, including an American and six Ukrainians, for supplying drones to Myanmar rebels and plotting against India. They were funneling drones from Europe through India, potentially aiding militant groups. Investigation continues into local collaborators and funding sources.
टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा