आंतरराष्ट्रीय धम्म परिषद -१
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:28+5:302015-02-06T22:35:28+5:30
फोटो - प्रिन्सेस मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा आणि भदंत बानागल उपतिस्स नायक थेरा

आंतरराष्ट्रीय धम्म परिषद -१
फ टो - प्रिन्सेस मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा आणि भदंत बानागल उपतिस्स नायक थेरा बुद्धा स्पिरिच्युअल पार्क येथे आंतरराष्ट्रीय धम्म संमेलन थायलंडच्या राजकुमारी मॉम लुयाँग जेआनकुरा मुख्य अतिथी : भदंत बानागल उपतिस्स नायक थेरो करणार उद्घाटन नागपूर : अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने बुद्धा स्पिरिच्युअल पार्क सिंहोरा कन्हान येथे आंतरराष्ट्रीय धम्म संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तीन दिवसीय या धम्म संमेलनामध्ये थायलंडच्या राजकुमारी (प्रिन्सेस) मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासंबंधात अधिक माहिती देताना बुद्धा स्पिरिच्युअल पार्कचे संस्थापक नितीन गजभिये यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले की, १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत हे धम्म संमेलन बुद्धा स्पिरिच्युअल पार्क येथे होणार आहे. श्रीलंका येथील महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष भदंत बानागल उपतिस्स नायक थेरा यांच्या हस्ते धम्म संमेलनाचे उद्घाटन करण्यात येईल. धम्म संमेलनामध्ये बांगलादेशचे भदंत वरसंबोधी, भारतातील श्रीलंकेचे उच्चायुक्त प्रो. सुदर्शन सेनवीरत्ने, भदंत सदानंद महास्थवीर, भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई, भदंत विमलकीर्ती गुणसिरी, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष चंद्रबोधी पाटील आपले विचार व्यक्त करतील. धम्म संमेलनामध्ये बौद्ध पूजा पाठ आणि धम्मसंगीतीचे आयोजन करण्यात आले आहे. या धम्म संमेलनासाठी थायलंडच्या प्रिंसेस मॉम लुयाँग राजादासिरी जेआनकुरा या विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. रविवारी त्यांचे नागपुरात आगमन होईल. सोमवार १६ फेब्रुवारी रोजी त्या नागपूर शहरातील विविध बुद्धविहारांना भेटी देतील. दीक्षाभूमीचे दर्शन घेतील. तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल, बुद्धभूमी खैरी, नागलोक, इंदोरा बुद्ध विहार आदींना भेटी देतील. पत्रपरिषदेत प्रसिद्ध आंबेडकरी गायक प्रकाश पाटणकर, आवाज इंडिया टीव्ही चॅनलचे संचालक अमन कांबळे, प्रीतम बुलकुंडे, राजीव झोडापे उपस्थित होते.