अंदरसूल जनहित पॅनलने सत्तेचा गड राखला
By Admin | Updated: April 25, 2015 02:10 IST2015-04-25T02:10:35+5:302015-04-25T02:10:35+5:30
अंदरसूल : येथील ग्रामपालिका निवडणुकीत सत्ताधारी गटाने पुन्हा एकदा घवघवीत यश मिळविले असून, सन २०१० ते २०१५ व नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत म्हणजे सलग दोन वेळा सत्ता शाबूत ठेवून विक्रम केला आहे. सतरा जागांपैकी सत्ताधारी जनहित पॅनलने दहा जागांवर विजय मिळवून सत्तेच्या चाव्या ताब्यात ठेवल्या आहेत. विरोधी जनशक्ती विकास पॅनलने सात जागांवर विजय मिळविला आहे. आमदार भुजबळांचे दोन शिलेदार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. त्यामध्ये जनहित पॅनलचे युवा नेते मकरंद सोनवणे यांनी ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. सुभाषराव सोनवणे, बाबूराव जाधव, कचरू पाटील गवळी, मोशीमभाई इनामदार व जनहित पॅनलचे सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. तसेच विरोधी जनशक्ती विकास पॅनलचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला कृउबा माजी सभापती किसनराव धन्

अंदरसूल जनहित पॅनलने सत्तेचा गड राखला
अ दरसूल : येथील ग्रामपालिका निवडणुकीत सत्ताधारी गटाने पुन्हा एकदा घवघवीत यश मिळविले असून, सन २०१० ते २०१५ व नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत म्हणजे सलग दोन वेळा सत्ता शाबूत ठेवून विक्रम केला आहे. सतरा जागांपैकी सत्ताधारी जनहित पॅनलने दहा जागांवर विजय मिळवून सत्तेच्या चाव्या ताब्यात ठेवल्या आहेत. विरोधी जनशक्ती विकास पॅनलने सात जागांवर विजय मिळविला आहे. आमदार भुजबळांचे दोन शिलेदार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. त्यामध्ये जनहित पॅनलचे युवा नेते मकरंद सोनवणे यांनी ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. सुभाषराव सोनवणे, बाबूराव जाधव, कचरू पाटील गवळी, मोशीमभाई इनामदार व जनहित पॅनलचे सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. तसेच विरोधी जनशक्ती विकास पॅनलचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला कृउबा माजी सभापती किसनराव धनगे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जगताप, कृउबा सभापती शिवाजी वडाळकर व पॅनलच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. जनहित पॅनलचे विजयी उमेदवार वॉर्ड क्र .१- वैशाली जनार्दन जानराव, वॉर्ड क्र . ४- शोभा बद्रीनाथ जाधव, दत्तू वाल्मीक सोनवणे, इंदुबाई रघुनाथ ढोले, वॉर्ड क्र .५- सुवर्णा सचिन बागुल, विनीता अमोल सोनवणे, चंद्रकांत बाबूराव साबरे, वॉर्ड क्र .६ - वाल्मीक मारुती शिंदे, अर्चना नितीन जाधव, बबन मुल्ताराम खैरनार अशा दहा उमेदवारांनी विजय मिळवला. विरोधी जनशक्ती विकास पॅनलचे वॉर्ड क्र .१ - राजेंद्र पंढरीनाथ पागिरे, मेहतर रेखा तुळशीराम, वॉर्ड क्र .२- नंदकिशोर किसनराव धनगे, औटे संगीता सोपान, वॉर्ड क्र .३ - सोपान नामदेव पवार, योगेश रावसाहेब जहागीरदार, लता बाळासाहेब बागले असे सात उमेदवार विजयी झाले आहेत. जनहित पॅनलची सक्षम व प्रभावी प्रचार यंत्रणा व कुशल संघटन विजयश्री खेचण्यात यशस्वी ठरले आहे आणि पुन्हा एकदा सत्तेची दोरी सत्ताधारी गटाच्या हाती आली असून, त्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. (वार्ताहर)