शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बीदर जिल्ह्यात भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, खुब्बा यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा आ. प्रभू चव्हाण यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 21:28 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आ. प्रभू चव्हाण चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

दयानंद बिरादार

औराद बाऱ्हाळी (जि. बीदर) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आ. प्रभू चव्हाण चौथ्यांदा विजयी झाले आहेत. विजयानंतर माध्यमांशी बोलताना भाजपातील अंतर्गत वाद उफाळून आला. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा यांनी काँग्रेसचा प्रचार केल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री आ. प्रभू चव्हाण यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणुकीत मुंबईचे पार्सल मुंबईला पाठवू असा प्रचार आ. चव्हाण यांच्या विरोधकांकडून झाल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनविली होती. पूर्वीच्या निवडणुकीत चव्हाण यांना विरोध झाला नाही. यावेळी विरोध होऊनही ९ हजार ५०० मतांनी ते विजयी झाले. विजयानंतर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुब्बा व त्यांच्या समर्थकांनी मला पाडण्यासाठी काँग्रेसला अर्थपुरवठा केला. त्यांच्या समर्थकांनी माझ्या विरोधात जाऊन काँग्रेसचा प्रचार केला. माझा उमेदवारी अर्ज भरताना व माजी मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांच्या औराद (बा.) येथील सभेला जाणूनबुजून ते गैरहजर राहिले. खुब्बा यांनी काँग्रेस उमेदवाराला आर्थिक पुरवठा तर केलाच शिवाय त्यांच्या समर्थकांनी माझ्या विरोधात प्रचार केला असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.पक्षश्रेष्ठीकडे तक्रार करणार...

भगवंत खुब्बा यांना उमेदवारी मिळावी यासाठी मी प्रयत्न केले. त्यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले. माझा वाढता प्रभाव व लोकप्रियता त्यांना सहन होत नाही. त्यांनी २०१८ मध्येही असाच प्रकार केला होता; मात्र त्याकडे मी दुर्लक्ष केले होते. आता त्यांची ही पक्षविरोधी कृत्याची तक्रार वरिष्ठांकडे करणार असल्याचे आ. प्रभू चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस