इस्लामिक स्टेटबद्दल तरूणांना वाटणारे आकर्षण चिंताजनक - राजनाथ सिंह
By Admin | Updated: November 29, 2014 12:13 IST2014-11-29T11:44:18+5:302014-11-29T12:13:52+5:30
भारतातील तरूण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेला भुलून त्याकडे आकर्षित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

इस्लामिक स्टेटबद्दल तरूणांना वाटणारे आकर्षण चिंताजनक - राजनाथ सिंह
>ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी २९ - भारतातील तरूण इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेला भुलून त्याकडे आकर्षित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. तरूणांना कट्टर धर्मवेडाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणा-या या संघटनेचे देशासमोर मोठे आव्हान उभे आहे, असेही ते म्हणाले. तसेच पाकिस्तान गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या ४९व्या परिषदेदरम्यान ते बोलत होते. आयएसमध्ये सामिल होण्यासाठी गेलेला कल्याणमधील चार तरूणांपैकी एक तरूण कालच भारत परत आल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जाते. अशा तरूणांची ओळख पटवण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी पोलिसांना पाकिस्तानमधील काही शक्ती भारतात अस्थिरत माजवायचा प्रयत्न करत असल्याचे सांगत दहशतवादी संघटना अल-कायदाबद्दलही सतर्क राहण्याची सूचना दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदूसोबतच मुसलमानांनीही मोठे योगदान दिले असून अल-कायदाचे मनसुबे हाणून पाडू असा विश्वास व्यक्त करत त्यांनी त्यांनी यावेळी केला. देशातील सुरक्षा व्यवस्था कोणतेही आक्रमण थोपवून धरम्यासाठी सक्षम असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान बर्दवान येथील स्फोटांचा छडा लावण्यात पश्चिम बंगाल पोलिस व एनआयएला यश मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.