शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

'मिसाईल मॅन' अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 14:12 IST

२७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले

मुंबई, दि. 27 - भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. लोकांचे राष्ट्रपती अशी त्यांची ओळख होती. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा जीवनप्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. डॉ. कलाम यांचं संपूर्ण आयुष्यच एक मोठा आदर्श आहे. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी. 

- अब्दुल कलाम यांचे पुर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते.

- भारताचे मिसाईल मॅन, लोकांचे राष्ट्रपती अशी अब्दुल कलाम यांची ओळख होती. त्यांना पद्म भूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

- मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीअरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डीआरडीओमध्ये (संरक्षण संशोधन विकास संस्था) काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय लष्करासाठी हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले. 

- कलाम यांना करीअरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये  प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. १९६३ साली कलाम यांनी नासा या जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थेला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही-३ या प्रकल्पांवर काम सुरु केले. हे दोन्ही प्रोजेक्ट यशस्वी झाले. 

- भारताचे तात्कालिक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाने पोखरण येथे दुसरी अणूस्फोटाची चाचणी केली. या चाचणीत कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या चाचणीनंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ म्हणून लोक त्यांना ओळखू लागले. 

- १९९२ ते १९९९ या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते. पोखरण अणू चाचणीच्यावेळी राजकीय आणि तांत्रिक दोन्ही आघाडयांवर त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 

 - भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २००२ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. २५ जून रोजी त्यांनी देशाचे ११ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 

 - राष्ट्रपती भवनातील सर्व दिवे सौरऊर्जेवर चालवण्यासाठी कलाम यांनी आराखडा तयार केला होता. पण या योजनेवर अंमलबजावणी करण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. सौरऊर्जेशिवाय भारताने आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणूऊर्जा आणि बायोफ्युल तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा असे त्यांचे मत होते. 

- अग्नि आणि पृथ्वी या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.

 - अब्दुल कलाम यांना लहान मुलांची आवड होती. ही लहान मुलेच उद्याची भविष्य आहेत. त्यामुळे ते जास्तीत जास्तवेळ मुलांसोबत घालवायचे. त्यांच्या कुतूहलपूर्ण प्रश्नांची उत्तरे द्यायचे.  

- जेव्हा डॉ. कलाम यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी निवडलं गेलं. तेव्हा शपथविधी कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते. पण डॉ. कलाम हे असे व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही. त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेंकड एसी रेल्वेनं दिल्लीला शपथविधीसाठी आणलं. 

- एकदा एका दीक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ. कलाम यांची खूर्ची इतर खूर्च्यांपेक्षा वेगळी आणि मोठी होती. त्यामुळे त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार देत, साध्या खूर्चीवर बसणे पसंद केलं. 

- एकदा कलाम यांनी फुटलेली काच इमारतीला बसवायला नकार दिला होता. ती फॅशनसाठी होती. पण त्यामुळं पक्ष्यांना नुकसान झालं असतं, असं सांगत कलाम यांनी हा सल्ला नाकारला होता. 

- एकदा 400 विद्यार्थ्यांसमोर बोलत असतांना अचानक वीज गेली. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ. कलाम संपूर्ण रांगेतून फिरत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि आपली चर्चा कायम ठेवली. 

- राष्ट्रपती बनल्यानंतर केरळच्या राज भवनात डॉ. कलाम यांनी सर्वात पहिल्यांदा निमंत्रित केलेले पाहूणे म्हणजे रस्त्यावर काम करणारा एका चांभार आणि छोट्या रेस्टॉरंटचा मालक.