PPF वरील व्याजदरात कपात
By Admin | Updated: March 18, 2016 19:17 IST2016-03-18T19:15:29+5:302016-03-18T19:17:49+5:30
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील ढढऋ व्याजदरात शुक्रवार केंद्र सरकारने कपात केली. पीपीएफवरील व्याजदर ८.७ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आले आहे

PPF वरील व्याजदरात कपात
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - देशभर चौफेर टीकेच्या भोवऱ्यात सापडलेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) व पेन्शनच्या रकमेवरील करप्रस्ताव सरकारने मागे घेतला आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील पीएफ व्याजदरात आज (शुक्रवारी) केंद्र सरकारने कपात केली आहे. पीपीएफवरील व्याजदर ८.७ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यापर्यंत खाली आणण्यात आले आहे. त्याचबरोबर किसान विकास पत्रावरील व्याजदरही कमी करण्यात आला आहे. आतापर्यंत किसान विकास पत्रावर वार्षिक ८.७ टक्के व्याज देण्यात येत होते. आता त्यावर वार्षिक ७.८ टक्के व्याज देण्यात येणार आहे.
त्यामुळे आता ईपीएफच्या ६0 टक्के रकमेवर तसेच राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस)मधून ४0 टक्के रक्कम काढली तरी त्यावर कर लागणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे कर्मचारी भविष्य निधीतून कितीही रक्कम काढली तरी त्यावर कर लागणार नाही.
Government reduces interest rate on Public Provident Fund (PPF) to 8.1% from 8.7%; and on Kisan Vikas Patra to 7.8% from 8.7%
— ANI (@ANI_news) March 18, 2016