शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जावरील चक्रवाढ व्याज केंद्र सरकार भरणार; सुप्रीम कोर्टात दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 06:54 IST

२ कोटी रुपयांपर्यंत कर्ज असणाऱ्यांना दिलासा

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांसाठी देण्यात आलेल्या मोरॅटोरियमच्या (कर्ज हप्ते न भरण्याची सवलत) काळातील २ कोटींपर्यंतच्या कर्जावर चक्रवाढ व्याज सरकार भरील, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.व्याज माफीची ही सवलत एमएसएमई क्षेत्राला देण्यात आलेली कर्जे, शैक्षणिक कर्जे, गृहकर्जे, ग्राहक वस्तू कर्जे, वाहन कर्जे आणि क्रेडिट कार्डावरील थकबाकी यांना मिळेल.सरकारने म्हटले की, महामारीच्या स्थितीत व्याजाचा भार सरकारने सहन करणे, हा एकमेव उपाय या समस्येवर आहे. यासाठी लागणाºया निधीसाठी सरकार संसदेची मंजुरी घेईल.सर्व वर्गवारीतील कर्जांवरील व्याज माफ करण्यासाठी बँकांना तब्बल ६ लाख कोटी रुपयांची गरज लागेल. मोरॅटोरियम घेणारे आणि न घेणारे अशा सर्वांनाच ही सवलत दिली जाईल.तज्ज्ञांकडून समजून घ्या, नेमका फायदा काय?कर्जदाराने मॉरॅटोरीयम सुविधा घेतली होती की, नाही हे ग्राह्य न धरता सर्वांनाच चक्रवाढ व्याज माफ केले जाईल याची ग्वाही देण्यात आल्याने प्रामाणिक कर्जदाराचाही फायदा सुनिश्चित केला आहे, हे त्या निर्णयातील सोनेरी रेषा ठरावी. फक्त सहा महिन्यांकरिता चक्रवाढ व्याज पद्धती ऐवजी सरळ व्याज पद्धतीनुसार व्याज आकारले जाणार आहे.दहा टक्के दराने दोन कोटी रुपये कर्ज १८० महिन्यात देय असल्यास सुरुवातीच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी चक्रवाढ पद्धतीने द्यावे लागणारे व्याज १०,२१,०६७ इतके असेल तर सरळ व्याज पद्धतीने ते दहा लाख रुपये इतके असेल. याचा अर्थ दोन कोटी रुपयांचे कर्ज असणाºया कर्जदारास केंद्र सरकारच्या या निर्णयाने २१,०६७ रुपयांचा नगद फायदा होणार आहे. - सीए डॉ. दिलीप सातभाई, पुणे

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय